लंडन : तब्बल सातवेळा विंबल्डन आपल्या नावावर करणारी अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्सला सलग दुस-या वर्षी पहिल्याच फेरीत बाद झाली. सेंटर कोर्टवर रात्री उशिरा झालेल्या सामन्यात फ्रेंचच्या पदार्पण करणा-या हार्मोनी टानने सेरेना विल्यम्सचा पराभव करत तिला गाशा गुंडाळायला लावला.
गेल्या वर्षी सेरेना विल्यम्सला विंबल्डनमधून दुखापतीमुळे सामना अर्धवट सोडून माघार घ्यावी लागली होती. त्यावेळीच ही तिची विंबल्डनमधील शेवटची मॅच ठरते का? अशी शंका उपस्थित केली जात होती.
मात्र तिने पुनरागमन केले परंतु पहिल्याच फेरीत ११५ व्या रँकवर असणा-या टानने तिला ७-५, १-६, ७-६(७) असा पराभवाचा धक्का दिला. विशेष म्हणजे हार्मोनी टान ही यापूर्वी विंबल्डनचा मेन ड्रॉ कधीही खेळली नव्हती.