25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeक्रीडाआंतरराष्ट्रीय नेमबाजीत शाहू मानेला सुवर्णपदक

आंतरराष्ट्रीय नेमबाजीत शाहू मानेला सुवर्णपदक

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर : कोरियामधील चेंगवान येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय विश्वचषक शूटिंग स्पर्धेत कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय नेमबाज शाहू माने याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना महिला नेमबाज मेहुली घोष हिच्या साथीने १० मीटर एअर रायफल मिश्र या प्रकाराचे सुवर्णपदक पटकावले. स्पर्धेतील भारताचे हे दुसरे सुवर्णपदक ठरले.

पात्रता फेरीत शाहू माने व मेहुली यांनी सहभागी ३० संघांमध्ये सर्वाधिक ६३४:३ गुण पटकावत प्रथम तर हंगेरीच्या संघाने ६३०:३ गुण घेऊन द्वितीय स्थान पटकावत थेट अंतिम फेरीत प्रवेश केला.

सुवर्ण पदकासाठी झालेल्या अंतिम फेरीत हंगेरीचे ऑलिम्पिकपटू ईस्तवान पेनी व ईस्तर मेसझारोस हे दोघेही अनुभवी असल्याने त्यांनी शाहू व मेहुली यांच्याविरुद्ध चांगली सुरुवात केली. मात्र, शाहू व मेहुली यांनी जोरदार प्रतिकार करून १७ विरुद्ध १३ अशी बाजी मारत सुवर्णपदक जिंकले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या