23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeक्रीडाशोएब अख्तर रुग्णालयात दाखल

शोएब अख्तर रुग्णालयात दाखल

एकमत ऑनलाईन

कराची : जवळपास गेल्या १० वर्षांपासून शोएब गुडघेदुखीच्या समस्येचा सामना करत आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर रुग्णालयात दाखल झाला आहे. खूप आधीपासूनच तो गुडघ्याच्या समस्येने त्रस्त आहे. या समस्येमुळेच त्याला पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे. दरम्यान शोएबच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली असून यानंतर शोएबने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक भावूक व्हीडीओ शेअर केला आहे.

जवळपास गेल्या १० वर्षांपासून शोएब गुडघेदुखीच्या समस्येचा सामना करत आहे. या समस्येमुळेच त्याचे करिअर खूप लवकर संपले अशी खंतही त्याने व्यक्त केली आहे. अन्यथा आणखी चार ते पाच वर्षे तो व्यवस्थित क्रिकेट खेळू शकला असता अशी त्याला खात्री होती. सध्या तो ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथील एका रुग्णालयात दाखल आहे.

या व्हीडीओमध्ये आपण शोएबला भावूक झालेला पाहू शकतो. त्याच्या गुडघ्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे त्याने या व्हीडीओमध्ये म्हटले आहे. त्याने आपल्या चाहत्यांना, तो लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना करण्यासही सांगितले आहे. त्याने आपल्या व्हीडीओमध्ये म्हटले आहे, ‘‘मी आणखी चार ते पाच वर्षे खेळू शकलो असतो. मात्र, मला हे ठाऊक होते की मी जास्त खेळलो तर मी लवकरच व्हीलचेअरवर येऊ शकतो. या कारणामुळेच मी क्रिकेटमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला.’

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर ‘रावळपिंडी एक्सप्रेस’या नावाने प्रसिद्ध होता. त्याच्या गोलंदाजीपुढे मोठमोठ्या फलंदाजांना घाम फुटायचा. शोएबच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्यात वेगवान गोलंदाजीचा विक्रम आहे. शोएबने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत १४ टी-२०, १६३ एकदिवसीय आणि ४६ कसोटी सामने खेळले. त्­याच्­या नावावर टी-२० मध्­ये २१, एकदिवसीयमध्­ये २४७ विकेट आणि कसोटीमध्­ये १७८ विकेट आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या