22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeक्रीडाआपण एकत्र राहू शकत नाही..; शोएब मलिकची पोस्ट चर्चेत

आपण एकत्र राहू शकत नाही..; शोएब मलिकची पोस्ट चर्चेत

एकमत ऑनलाईन

कराची : ‘आपण एकत्र राहू शकत नाही’अशा आशयाची शोएब मलिकची एक जुनी पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. दरम्यान शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांच्यात काही ठीक सुरू नसल्याच्या चर्चेने सोशल मीडियावर उधाण आले आहे. मागच्या अनेक दिवसांपासून विभक्त रहात असल्याची माहिती पाकिस्तानच्या एका वाहिनीने दिली होती. दरम्यान, आता त्यांचा घटस्फोट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

शोएब आणि सानिया ३० ऑक्टोबर रोजी मुलगा इझानच्या वाढदिवशी शेवटचे एकत्र दिसले होते, पण त्यानंतर शोएब मलिकने सोशल मीडियावर जे काही लिहिले त्यावरून लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. तर सानिया मिर्झाच्या पोस्टने त्याला अप्रत्यक्षपणे दुजोरा दिला आहे.

जेव्हा तुझा जन्म झाला तेव्हा आमच्यासाठी जीवनाला एक विशेष अर्थ होता. आपण एकत्र राहू शकत नाही, रोज भेटू शकत नाही, पण बाबा प्रत्येक क्षणी तुझा आणि तुझ्या हसण्याचा विचार करतो. बाबा आणि मम्मी तुझ्यावर प्रेम करतात. अशा आशयाची पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दरम्यान, सानियाने केलेल्या पोस्टने शोएबच्या या जुन्या पोस्टला अप्रत्यक्षपणे दुजोरा दिला आहे. तिने तिच्या इन्स्टावरून एक पोस्ट शेयर करत ‘ज्यांची मने आता तुटली आहेत ते सगळे कुठे जातात, या सगळ्यांच्या समस्यांवर अल्लाहच मदत करेल.’ असे सानियाने म्हटले आहे.
सोशल मीडिया पोस्टवरून शोएब मलिकसोबतचा तिचा १२ वर्षांचा संसार मोडणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या