नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक धावा करणा-या फलंदाजाला ऑरेंज कॅप आणि सर्वाधिक विकेट घेणा-या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणा-या फलंदाजांच्या यादीत फाफ डु प्लेसिस, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, डेवॉन कॉनवे, शुभमन गिल असे अनेक खेळाडू आहेत.
दरम्यान, ऑरेंज कॅपच्या शर्यतीत यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल विराट कोहलीच्या पुढे गेले आहेत. यशस्वी जैस्वाल सध्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुस-या स्थानावर तर शुभमन गिल तिस-या स्थानावर आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने आतापर्यंतच्या हंगामात सर्वाधिक धावा केल्याने त्याच्याकडे सध्या ऑरेंज कॅप आहे. डु प्लेसिसने दहा सामन्यांमध्ये ५११ धावा केल्या आहेत. दुस-या क्रमांकावर राजस्थानचा फलंदाज यशस्वी जैस्वाल असून त्याने ११ सामन्यांत ४७७ धावांचा पल्ला गाठला आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत गुजरातचा शुभमन गिल तिस-या क्रमांकावर पोहोचला आहे.