22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeक्रीडापहिल्या फेरीत सिंधूचा विजय; सायना पराभूत

पहिल्या फेरीत सिंधूचा विजय; सायना पराभूत

एकमत ऑनलाईन

कौलालंपूर : भारताच्या दोन अव्वल बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांचे मलेशिया ओपन सुपर ७५० मधील पहिल्या फेरीचे सामने आज झाले. यामध्ये पी.व्ही. सिंधूने विजय मिळवला, तर लंडन ऑलिम्पिकच्या कांस्य पदक विजेत्या सायना नेहवालला पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

माजी वर्ल्ड चॅम्पियन सिंधूने थायलंडच्या जागतिक क्रमवारीत १० व्या स्थानावर असलेल्या चोचुवांगचा २१-१३, २१-१७ अशा सरळ गेममध्ये पराभव केला. तर दुसरीकडे लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई करणा-या सायना नेहवालचा जागतिक क्रमवारीत ३३ व्या क्रमांकावर असणा-या अमेरिकेच्या आयरिस वांगने ११-२१ १७-२१ असा पराभव केला.

सातव्या स्थानावर असणारी सिंधू आता थायलंडच्या २१ वर्षाच्या चैवानशी लढणार आहे. जागतिक ज्यूनियर रँकिंगमध्ये चैवान अव्वल स्थानावर होती. याचबरोबर बँकॉकमध्ये झालेल्या उबर कपमध्ये कांस्य पदक मिळवणा-या संघात देखील तिचा समावेश होता.

दुसरीकडे बी सुमित रेड्डी आणि अश्विनी पोनप्पा या जोडीला देखील पराभवाचा सामना करावा लागला. जागतिक क्रमवारीत २१ व्या स्थानावर असलेल्या रॉबिन टाबलिंग आणि सेलेना पेक या नेदरलँडच्या जोडीने भारतीय जोडीचा १५-२१, २१-१९, १७-२१ असा पराभव केला. हा सामना ५२ मिनिटे चालला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या