18.5 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeक्रीडासर रवींद्र जडेजाने थोपटली अम्पायरची पाठ

सर रवींद्र जडेजाने थोपटली अम्पायरची पाठ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुस-या टप्प्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणा-या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला सलग दुस-या पराभवाचा सामना करावा लागला. महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने ६ विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयानंतर सीएसकेने गुणतक्त्यात अव्वल स्थानावर झेप घेतली. या सामन्यानंतर कर्णधार कोहलीने गोलंदाजांचे कान टोचले, परंतु या सामन्यात असा एक प्रसंग घडला की ज्याची चर्चा आता होत आहे. सीएसकेचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याने चक्क अम्पायर अनिल चौधरी यांच्या पाठीवर थाप मारली.

आरसीबीची फलंदाजी सुरू असताना ११व्या षटकातील चौथ्या चेंडूवर हा मजेशीर प्रसंग घडला. जडेजाच्या गोलंदाजीवर देवदत्त पडिक्कल स्ट्राईकवर होता. जडेजाने ऑफ स्टम्पबाहेर चेंडू टाकला आणि त्यानंतर पडिक्कल अम्पायरच्या निर्णयाकडे पाहत होता. पण, अनिल चौधरीने वाईड बॉल दिला नाही. या निर्णयानंतर जडेजानेही पडिक्कलकडे पाहून योग्य निर्णय आहे, असं डोकं हलवलं आणि पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी जाताना अम्पायरच्या पाठीवर हात मारला. सध्या हा व्हीडीओ चांगला व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या