27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeक्रीडाविराटच्या पॅटरनिटी लीव्हला स्मिथचा पाठिंबा

विराटच्या पॅटरनिटी लीव्हला स्मिथचा पाठिंबा

एकमत ऑनलाईन

ऑस्ट्रेलिया : टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौ-यावर आहे. या दौ-यात टीम इंडियाने एकदिवसीय मालिका गमावली. मात्र यानंतर २-१ च्या फरकाने टी-२० मालिका जिंकली. टी-२० मालिकेत बाजी मारल्यानंतर भारतीय संघ आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. १७ डिसेंबरपासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार असून भारतीय संघ पहिल्यांदाच परदेशात गुलाबी चेंडूवर सामना खेळणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने हा सामना संपल्यानंतर भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या कसोटी सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली पॅटरनिटी लीव्हवर जाणार आहे. या निर्णयावरून विराटवर टीकाही झाली.

परंतु ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथने विराटच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे. पहिल्या कसोटीनंतर विराटचे भारतात परतणे यात टीम इंडियाचे नुकसान आहे. विराट हा उत्कृष्ट खेळाडू आहे आणि त्यालाही ऑस्ट्रेलियात खेळायला आवडतं. पण तो देखील एक माणूस आहे आणि क्रिकेटव्यतिरिक्तही विराटला एक आयुष्य आहे. आपल्या पहिल्या बाळाच्या जन्मावेळी तो परिवारासोबत राहतो आहे ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. यासाठी त्याला दाद द्यायलाच हवी. पहिल्या कसोटी सामन्याआधी स्मिथ पत्रकारांशी बोलत होता. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व हे उप-कर्णधार अजिंक्य रहाणेकडे येणार आहे.

इंग्लंडमध्ये फायझरचा ‘डेटा हॅक’; इंटरपोलचा इशारा ठरला खरा

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या