25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeक्रीडासोलापूर विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात

सोलापूर विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
विलासराव देशमुख फाउंडेशन ग्रुप ऑफ इस्टिट्युशनस लातूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठांतर्गत सोलापूर विभागीय मुला-मुलींच्या व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत विविध शाखांच्या २७ महाविद्यालयांनी सहभाग घेतला. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेचे उद्घाटन विलासराव देशमुख स्कूल ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. बी. एस. वाकुरे व नळेगावच्या शिवजागृती महाविद्यालयाचे प्रा. डॉ. कैलास पाळणे यांच्या हस्ते झाले. क्रीडा समन्वयक प्रा. आर. आर. पिंड यांनी विविध समित्यांच्या सहाय्याने स्पर्धेचे उत्तम नियोजन केले त्यांना कर्मचारी, विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

मुलांच्या सामन्यात बी. जे. पी. एस. कॉलेज ऑफ फार्मसी परभणी हा संघ विजेता तर ऑर्चिड इंजिनिअरींग कॉलेज सोलापूर उपविजेता ठरला. मुलींच्या सामन्यात श्रीराम शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी पानीव विजेता तर गोदावरी कॉलेज ऑफ फार्मसी कोळपा हा संघ उपविजेता ठरला. दोन्ही गटातील विजेत्या व उपविजेत्या संघांचे विलासराव देशमुख फाऊंडेशन ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्सच्या वतीने प्राचार्य डॉ. वाकुरे, प्रा. आर. यु. इंगळे यांनी अभिनंदन केले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या