कोलकाता : भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना छातीत दुखू लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सौरव यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याचे कळले. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ते लवकरात लवकर बरे होवोत यासाठी सदिच्छा असे ट्वीट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे.
सौरव यांच्यावर अँजिओप्लास्टी करावी लागण्याची शक्यता आहे. त्यांना कोलकाताच्या वूडलँड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घरातल्या जिममध्ये व्यायाम करत असताना गांगुली यांना छातीत दुखू लागले. त्यानंतर त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. गांगुली यांच्याबाबतचे वृत्त पसरताच सोशल मीडियावर गेट वेल सूनच्या सदिच्छांचा पाऊस पडला आहे. प्रिन्स आॅफ कोलकाता अशी बिरुदावली लाभलेले गांगुली भारतीय संघाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक आहेत.
अक्सा बीचवर सापडला महिलेचा मृतदेह