32.5 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home क्रीडा सौरव गांगुलीची प्रकृती पुन्हा बिघडली

सौरव गांगुलीची प्रकृती पुन्हा बिघडली

एकमत ऑनलाईन

कोलकाता : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याला पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. कोलकाता येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहे. काल रात्री त्याच्या छातीत पुन्हा दुखू लागले आणि त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले.

काही दिवसांपूर्वी गांगुलीला हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्याच्यावर कोलकातातील वूडलँड्स हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर डिस्चार्ज घेऊन तो घरी परतला होता. पण, आता पुन्हा त्याच्या छातीत दूखायला लागले आहे.

गांगुलीची प्रकृती स्थीर असून, त्याला आता बरे वाटत आहे. कुटुंबीय व डॉक्टर यांना कोणताही धोका पत्करायचा नव्हता आणि त्यामुळे पुढील काही दिवस त्याला हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

सिंधुताई सपकाळ यांना सामाजिक कार्यासाठी ‘पद्मश्री’

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या