मुंबई : वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी खांद्याच्या दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्धच्या संपूर्ण वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने आता याला दुजोरा दिला आहे. शमीच्या जागी स्पीड गन उमरान मलिकचा वनडे मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान बांगलादेश दौ-यावर भारताला तीन वनडे आणि दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. एकदिवसीय मालिका ४ डिसेंबरपासून म्हणजेच रविवारपासून ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
वनडे मालिकेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), के. एस. भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.