22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeक्रीडा‘आयपीएल’वरून ‘बीसीसीआय’मध्ये फूट?

‘आयपीएल’वरून ‘बीसीसीआय’मध्ये फूट?

एकमत ऑनलाईन

यजमानपदाच्या हक्कावरून ‘बीसीसीआय’मध्ये विविध गट पडले आहेत

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगचे आयोजन सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. कोणत्याही परिस्थितीत यंदा ‘आयपीएल’चे आयोजन करण्यासाठी ‘बीसीसीआय’ आग्रही आहे. पण यजमानपदाच्या हक्कावरून ‘बीसीसीआय’मध्ये विविध गट पडले आहेत. भारतातच ‘आयपीएल’चे आयोजन करण्यासाठी काही जण आग्रही असले तरी गरज पडल्यास देशाबाहेर ही स्पर्धा खेळवण्याची काहींची तयारी आहे.

‘‘भारतातच ही स्पर्धा खेळवण्यात आल्यामुळे कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास देशाला मदत होईल, असा एक मतप्रवाह आहे. मात्र गरज पडल्यास, भारताबाहेर आयपीएलचे आयोजन करण्यास काहींनी होकार दर्शवला आहे. त्यामुळे ‘बीसीसीआय’मधील निर्णय घेणाºयांमध्ये ३ विरुद्ध २ असे गट पडले आहेत. भारतातच ही स्पर्धा झाल्यास, आम्हाला परदेशात प्रवास करण्याची गरज भासणार नाही. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आम्ही नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करू. तसेच देशातच ही स्पर्धा घेतल्यास, चाहत्यांमध्येही आमच्याविषयी देशप्रेमाची भावना निर्माण होईल, असेही काहींचे म्हणणे आहे,’’ असे ‘बीसीसीआय’च्या एका पदाधिकाºयाने सांगितले.

Read More  विनाकारण भीती दाखवून अ‍ॅडमिट करणाऱ्या रुग्णालयाला दणका

‘‘आयपीएलचे कोणत्याही परिस्थितीत आयोजन करण्याला अनेकांनी पहिली पसंती दर्शवली असून गरज पडल्यास, कोणताही निर्णय घेण्यासाठी ते तयार आहेत. खेळाडूंचे आरोग्य तसेच सुरक्षितता याला आमचे पहिले प्राधान्य असून लवकरच स्पर्धेविषयीच्या सर्व पर्यायांचा विचार करून वेळापत्रकाची आखणी केली जाईल,’’ असेही त्यांनी सांगितले.
एका फ्रेंचायझीच्या पदाधिकाºयाने सांगितले की, ‘‘भारतामध्येच आयपीएलचे आयोजन झाल्यास जगाला एक वेगळा संदेश देता येईल. त्याचबरोबर देशातील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास मदत होईल. परदेशात मात्र खर्च अधिक होईल. आमच्यासाठी तसेच बहुतेक सर्व संघांसाठी भारत हाच योग्य पर्याय आहे, असे मला वाटते.’’

सराव शिबिराची आवश्यकता
चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज दीपक चहर म्हणाला की, ‘‘आयपीएलद्वारे क्रिकेट मोसमाला सुरुवात होईल, अशी आशा आहे. आयपीएलनंतर अनेक खेळाडू एकदिवसीय किंवा कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी मोकळे होतील. त्यामुळे त्यांच्यावरील ताण हलका होईल. आयपीएलमुळे गोलंदाजांनाच नव्हे तर जगभरातील क्रिकेटपटूंना आपली लय मिळवण्यासाठी फायदा होणार आहे. मात्र आयपीएलला सुरुवात होण्यासाठी योग्य सराव शिबिराची आवश्यकता आहे.’’

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या