23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeक्रीडाश्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा निवृत्त

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा निवृत्त

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने निवृत्ती जाहीर केली आहे. सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून लसिथ मलिंगा निवृत्त झाला आहे. ३८ वर्षांच्या मलिंगाने सोशल मीडियावरून याबद्दलची माहिती दिली.

आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी श्रीलंकेने जाहीर केलेल्या संघात मंिलगाला स्थान देण्यात आलेले नाही. त्यानंतरच मलिंगाने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. मलिंगाने ३० कसोटी, २२६ एकदिवसीय आणि ८४ टी-२० सामन्यांमध्ये श्रीलंकेचे प्रतिनिधीत्व केले आहे. मार्च २०२० मध्ये पल्लीकलमध्ये मलिंगा वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा सामना खेळला आहे.
कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांमध्ये मलिंगाने ५४६ विकेट्स घेतल्या आहेत.

मलिंगाने २०११ मध्ये कसोटी आणि २०१९ मध्ये एकदिवसीय सामन्यातून निवृत्ती जाहीर केली. मात्र तो टी-२० सामन्यांमध्ये खेळत होता. मात्र आता टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघात स्थान न मिळाल्याने त्याने सर्वच प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या