कोलंबो : श्रीलंकेतील आर्थिक आणि राजकीय संकटाच्या काळात तेथे इंधनासाठी संघर्ष सुरू आहे. महागाईच्या झळा सोसणा-या नागरिकांना पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी दोन दिवस रांगा लावाव्या लागत आहेत. श्रीलंकेचा क्रिकेटपटू चमिका करुणारत्ने देशात सध्या सुरू असलेल्या पेट्रोल टंचाईमुळे खूप त्रस्त झाला आहे.
राजधानी कोलंबोमध्ये दोन दिवस रांगेत उभे राहिल्यानंतर त्याने गाडीत पेट्रोल भरले. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना तो म्हणाला, सुदैवाने दोन दिवस लांब रांगेत उभे राहिल्यानंतर पेट्रोल मिळाले. मला सरावासाठी कोलंबो आणि वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागेल, कारण क्लब क्रिकेटचा हंगाम सुरू आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून मी इंधनासाठी रांगेत उभा आहे. मलाही इंधन पुन्हा भरण्याची वाट पहावी लागली. गेल्या दोन दिवसांपासून मी तेल भरण्यासाठी रांगेत उभा आहे.
सुदैवाने मला १०,००० रुपयांचे हे पेट्रोल जास्तीत जास्त दोन ते तीन दिवस टिकेल.
श्रीलंकेत आणीबाणीच्या काळात आता राजकीय संकटही निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत आशिया चषक २०२२ च्या यजमानपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
चमिकाला स्वत:बद्दल आणि श्रीलंकेच्या संघाच्या तयारीबद्दल आत्मविश्वास आहे. आशिया चषक स्पर्धेसाठी आम्ही सज्ज आहोत आणि मला वाटते की मोठ्या स्पर्धेसाठी देश पुरेसे इंधन देईल, असे तो म्हणाला. आम्ही ऑस्ट्रेलियाशी खेळत आहोत आणि सामना चांगला झाला. आशिया चषक स्पर्धेची तयारीही जोरात सुरू आहे. ऑस्ट्रेलियानंतर आता पाकिस्तान क्रिकेट संघ श्रीलंकेच्या दौ-यावर आहे.