22.2 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeक्रीडाराज्यस्तरीय एआययू बॅडमिंटन निवड चाचणीला प्रारंभ

राज्यस्तरीय एआययू बॅडमिंटन निवड चाचणीला प्रारंभ

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक व मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचलित कै बि व्ही. काळे आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एआययु निवड चाचणी बॅडमिंटन २०२२ स्पर्धेचे आयोजन लातूर येथील सुशीलादेवी महाविद्यालय बॅडमिंटन हॉल येथे आयोजित केले असून त्याचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला.
या स्पर्धेत राज्यातून आयुर्वेद मेडिकल डेंटल नर्सिंग फिजिओथेरपी इत्यादी या महाविद्यालयातील १२० विद्यार्थी स्पर्धक व साठ विद्यार्थिनी यांनी सहभाग नोंदवाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कै. बी व्ही काळे आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आनंद पवार, पत्रकार हरिराम कुलकर्णी, प्रा. बालाजी थोरबोले, डॉ. शरद साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी प्राचार्य डॉ. पवार म्हणाले की, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बी. व्ही. काळे आयुर्वेद महाविद्यालय व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्यामार्फत होत असलेल्या राज्यस्तरीय विविध स्पर्धेचे आयोजन आम्ही मागील २० वर्षापासून करत आहोत. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबच त्यांच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी त्यांना देश व राज्य पातळीवर विविध स्पर्धा मध्ये भाग घेण्यासाठी ह्या उपयुक्त चाचणी असून त्या निश्चित भविष्यात मुलांना यश मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतील. तसेच देशाचे क्रीडा क्षेत्रात नाव मोठे करण्यास प्रवृत्त करतील. यावेळी प्रा. बालाजी थोर्बोले, डॉ. शरद साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमास विविध महाविद्यालयातून टीम कोच आलेले आहेत. डॉ. आनंद मारगुडी, प्रा. चौधरी, प्रा. कदम, प्रा. गायकवाड, प्रा. नंदकिशोर सगरे, प्रा. थोरात, गिरीश भवरे, संदीप कापसे, प्रा. शेख, अश्विनी आहेर, डॉ. सिद्दीकी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. नाईकवाडी यांनी केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या