31.2 C
Latur
Wednesday, June 7, 2023
Homeक्रीडाजायस्वालचे वादळ, राजस्थानचा धावांचा डोंगर

जायस्वालचे वादळ, राजस्थानचा धावांचा डोंगर

एकमत ऑनलाईन

जयपूर : यशस्वी जायस्वालच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर राजस्थानने निर्धारित २० षटकात पाच विकेटच्या मोबदल्यात २०२ धावांचा डोंगर उभारला आहे. यशस्वी जायस्वालशिवाय ध्रुव जुरेल आणि देवदत्त पडिक्कल यांनी अखेरच्या षटकात आक्रमक फलंदाजी केली. चेन्नईला विजयासाठी २०३ धावांची गरज आहे.

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जोस बटलर आणि यशस्वी जायस्वाल यांनी राजस्थानला आक्रमक सुरुवात करुन दिली. पहिल्या सहा षटकात या दोघांनी ६४ धावांचा पाऊस पाडला. जोस बटलर याने संयमी फलंदाजी केली तर यशस्वी जायस्वाल याने आक्रमक फलंदाजी केली. जोस बटलरने २१ चेंडूत २७ धावांचे योगदान दिले. या खेळीत बटलरने चार चौकार लगावले. रविंद्र जडेजाने बटलरला तंबूत पाठवले. जोस बटलर आणि यशस्वी जायस्वाल यांनी ८६ धावांची भागिदारी केली.

यशस्वी जायस्वाल याने आक्रमक फलंदाजी करत राजस्थानच्या डावाला आकार दिला. राजस्थानचा सलामी फलंदाज यशस्वी जायस्वाल याने ४३ चेंडूत ७७ धावांचा पाऊस पाडला. यामध्ये त्याने चार षटकार आणि ८ चौकार लगावले. यशस्वी जायस्वाल याने दमदार फलंदाजी केली. संजू सॅमसन आणि शिमोरन हेटमायर यांना मोठी खेळी करता आली नाही. संजू सॅमसन याने १७ चेंडूत १७ धावांचे योगदान दिले तर शिमरोन हेटमायर याला दहा चेंडूत आठ धावा काढता आल्या. चार विकेट झटपट पडल्यानंतर ध्रुव जुरेल आणि देवदत्त पडिक्कल यांनी राजस्तानला १९० पार नेले.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या