24.8 C
Latur
Monday, September 27, 2021
Homeक्रीडासुमीत नागलची विजयी सलामी

सुमीत नागलची विजयी सलामी

एकमत ऑनलाईन

टोकियो : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत टेनिस क्रीडा प्रकारात भारताने दमदार सुरुवात केलीय. पुरुष एकेरीत सुमित नागलने विजयी सलामीसह नवा इतिहास रचला आहे़ त्याने डेनिस इस्तोमिनला तीन सेटमध्ये पराभूत करत दुसरी फेरी गाठली आहे. मागील २५ वर्षांत ऑलिम्पिक स्पर्धेत एकेरीत विजयी सुरुवात करणारा तो तिसरा भारतीय टेनिसपटू ठरला आहे. सुमित नागलने २ तास आणि ३४ मिनिटे रंगलेल्या सामन्यात इस्तोमिन याला ६-४, ६-७, ६-४4 अशा फरकाने पराभूत केले. दुस-या फेरीत त्याचा सामना जागतिक क्रमवारीत दुस-या स्थानावर असलेल्या डॅनिल मेदवेदेव याच्याशी होणार आहे.

यापूर्वी १९८८ च्या सियोल ऑलिम्पिक स्पर्धेत जीशान अलीने टेनिस पुरुष एकेरीत पराग्वेच्या विक्टो काबालेरोला पराभूत केले होते. याशिवाय लिएंडर पेसने १९९६ च्या अटलांटा ऑलिम्पिक स्पर्धेत ब्राझीलच्या फर्नांडो मेलिजेनीला मात दिली होती. यावेळी लिएंडर पेसने कांस्य पदक जिंकले होते. लिएंडर पेसनंतर कोणत्याही भारतीय टेनिसपटूला ऑलिम्पिक स्पर्धेत एकेरीत मॅच जिंकता आली नव्हती. सोमदेव देववर्मन आणि विष्णू वर्धन २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कोर्टवर उतरले. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

लसींसोबत आणखी २ औषधे बाजारात!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या