19 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeक्रीडासनरायजर्स हैदराबाद संघाचा कर्णधार केन विल्यमसन रिलीज

सनरायजर्स हैदराबाद संघाचा कर्णधार केन विल्यमसन रिलीज

एकमत ऑनलाईन

कोलकाता : आयपीएल २०२३ स्पर्धेपूर्वी मिनी ऑक्शन होणार असून सध्या सर्व संघ आपले खेळाडू रिटेन आणि रिलीज करुन एक यादी बीसीसीआयकडे पाठवत आहेत. यादरम्यान सनरायजर्स हैदराबाद संघाने एक अत्यंत मोठा निर्णय घेत त्यांचा कर्णधार आणि स्टार खेळाडू केन विल्यमसन याला रिलीज केलं आहे. सोशल मीडिया पोस्ट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. ज्यामुळे आता आगामी आयपीएल २०२३ मध्ये हैदराबादचं कर्णधारपद कोणाकडे असणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

वर्ल्ड क्रिकेटमधील एक अव्वल दर्जाचा फलंदाज ज्याचं नेतृत्त्व कायमच वाखाणण्याजोगं असतं असा न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन यंदा सनरायजर्स हैदराबादचं नेतृत्त्व करणार नाही. हैदराबाद संघाने केनला रिलीज केलं आहे. त्यामुळे तब्बल ८ वर्षे हैदराबाद संघासोबत घालवण्यानंतर आता केन आणि सनरायझर्स हैदराबाद संघ वेगळा होणार आहे. आयपीएल २०२२ च्या मेगा ऑक्शनमध्ये हैदराबाद संघाचा सर्वात महागडा खेळाडू केन होता. त्यांनी त्याच्यासाठी १४ कोटी खर्च केले होते. पण २०२२ मध्ये त्याने फार काही अप्रतिम कामगिरी केली नाही, तसंच संघही खास कमाल दाखवू शकला नाही. ज्यानंतर आता केनला रिलीज करण्यात आलं आहे. केनने हैदराबाद संघासाठी ७६ सामने खेळत ३६.२२ च्या सरासरीने आणि १२६.०३ च्या स्ट्राईक रेटने २ हजार १०१ धावा केल्या आहेत. ४६ वेळा त्याने संघाचे नेतृत्त्व केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या