26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeक्रीडासूरज वशिष्ठने ३२ वर्षांनी जिंकून दिले सुवर्णपदक

सूरज वशिष्ठने ३२ वर्षांनी जिंकून दिले सुवर्णपदक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताचा १६ वर्षीय कुस्तीपटू सूरज वशिष्ठने ग्रीको-रोमन अंडर-१७ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. सूरजने ५५ किलो वजनी गटात हे यश मिळवले. ३२ वर्षांनंतर अंडर-१७ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कुस्तीत सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय कुस्तीपटू ठरला आहे.

सूरज वशिष्ठने ५५ किलो वजनी गटात हे यश मिळवले आहे. यासह ३२ वर्षांनंतर अंडर-१७ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कुस्तीत सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय कुस्तीपटू ठरला आहे. १९९० मध्ये पप्पू यादव चॅम्पियन झाला तेव्हा भारताने या स्पर्धेत शेवटचे सुवर्णपदक जिंकले होते.

सूरजने युरोपियन चॅम्पियन फरीम मुस्तफेववर ११-० असा मोठा विजय मिळवला. सूरजने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमणाला सुरुवात करत १-० अशी आघाडी घेतली. दुस-या हाफच्या सुरुवातीलाच त्यांनी ३-० अशी आघाडी घेतली. युरोपियन कुस्तीपटूला पुनरागमनाची संधी नव्हती.

पप्पू यादव १९९० मध्ये चॅम्पियन झाल्यानंतर आणखी पाच भारतीय कुस्तीपटू अंतिम फेरीत पोहोचले, परंतु कोणालाही सुवर्णपदक मिळू शकले नाही. ३२ वर्षांपासून सुरू असलेला हा दुष्काळ आता सूरजने संपवला आहे. इतिहास रचल्यानंतर सूरज म्हणाला, मला माझ्या वजन प्रकारात जगातील सर्वोत्तम कुस्तीपटू व्हायचे आहे. सीनियर वर्ल्ड जेतेपद हे माझे स्वप्न आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या