27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeक्रीडासुरेश रैनाची क्रिकेटमधून निवृत्ती; लीगमध्ये खेळणार

सुरेश रैनाची क्रिकेटमधून निवृत्ती; लीगमध्ये खेळणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताचा स्टार फलंदाज सुरेश रैनाची आयपीएल २०२३ मध्ये पुनरागमन करण्याची शक्यता आता संपुष्टात आली आहे. सुरेश रैनाने देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मात्र चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे की, सुरेश रैना क्रिकेट खेळत राहणार आहे.

हिंदी वृत्तानुसार सुरेश रैना दक्षिण आफ्रिका, यूएई आणि श्रीलंकेच्या टी-२० लीगच्या पुढील हंगामात सहभागी होणार आहे.
सुरेश रैनाला यंदाच्या आयपीएलसाठी कोणत्याही संघाने विकत घेतले नव्हते. सुरेश रैनाने २०२० मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यामुळे त्याच्या आयपीएलमध्ये पुनरागमनाची शक्यताही जवळपास संपुष्टात आली होती. सुरेश रैना आता देशांतर्गत क्रिकेटला अलविदा करून परदेशी लीगमध्ये खेळणार आहे.

बीसीसीआयने नुकतेच स्पष्ट केले आहे की, त्यांच्याशी करार असलेला कोणताही खेळाडू कोणत्याही परदेशी लीगमध्ये भाग घेऊ शकत नाही. सुरेश रैना हा टी-२० फॉरमॅटमधील जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक म्हणून ओळखला जातो. सुरेश रैनाला ‘मिस्टर आयपीएल’ म्हणूनही ओळखले जाते. रैनाने आयपीएलमधील २०५ सामन्यांमध्ये ३२.५ च्या सरासरीने आणि सुमारे १३७च्या स्ट्राईक रेटने ५,५२८ धावा केल्या आहेत.

सुरेश रैनाने चेन्नई सुपर किंग्जला तीन वेळा विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, २०२० मध्ये सुरेश रैनाची आयपीएल कारकीर्द शेवटच्या दिशेने गेली. संघ व्यवस्थापनाशी झालेल्या वादामुळे सुरेश रैनाने २०२० च्या आयपीएलमध्ये भाग घेतला नाही. त्यानंतर २०२२ मध्ये त्याने आयपीएल मेगा लिलावात १ कोटी बेस प्राईस ठेवली होती. मात्र त्याला कोणी विकत घेतले नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या