28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeक्रीडाटी २० विश्वचषक सराव सामन्यांची घोषणा

टी २० विश्वचषक सराव सामन्यांची घोषणा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने यावर्षी होण-या टी-२० विश्वचषक स्पर्धेचे बिगुल वाजवले आहे. ही स्पर्धा ऑक्टोबर- नोव्हेबर मध्ये ऑस्ट्रेलियात खेळवली जाणार आहे. आयसीसीने टी २० विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणा-या सर्व १६ संघांच्या सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

यामध्ये टीम इंडियाला दोन सराव सामने खेळायचे आहेत. हे सराव सामने १० ते १९ ऑक्टोबर दरम्यान खेळवले जातील. सर्व सामने मेलबर्न आणि ब्रिस्बेनमध्ये होणार आहे.

टी २० विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणा-यासर्व १६ संघांमध्ये १० दिवसांत १५ सराव सामने खेळवले जातील. यादरम्यान भारतीय संघाला १७ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. तर दुसरा सराव सामना १९ ऑक्टोबरला न्यूझीलंडकडून होणार आहे.

दोन्ही सामने ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर होणार आहेत. आयसीसीने दोन फे-यांमध्ये सराव सामने आयोजित केले आहेत. पहिल्या फेरीत सराव सामने खेळणारे संघ १० ते १३ ऑक्टोबर दरम्यान सामने खेळतील. हे सामने मेलबर्न क्रिकेट ग्राउंड आणि जंक्शन ओव्हल येथे होणार आहेत. तसेच थेट गट-१२ साठी पात्र ठरलेल्या संघांना १७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान ब्रिस्बेन येथे सराव सामने खेळाले जातील. सराव सामन्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यांचा दर्जा असणार नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या