25 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeक्रीडापी. व्ही. सिंधूला ताईचे कोडे काही उलगडेना!

पी. व्ही. सिंधूला ताईचे कोडे काही उलगडेना!

एकमत ऑनलाईन

कौलालंपूर : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने दिमाखात मलेशिया मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. मात्र आज उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात ताई त्झू यिंगने सिंधूचा पराभव करत तिचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. सिंधूला काही केल्या ताईचे कोडे उलगडले नाही.
मलेशिया मास्टर्समध्ये सिंधू आणि ताईच्या सामन्यात पहिला गेम ताईने १३-२१ असा चांगल्या गुणफरकाने जिंकला होता. मात्र दुस-या गेममध्ये सिंधूने कडवा प्रतिकार केला. तिने दुसरा गेम २१-१२ असा जिंकला. मात्र तिस-या डावात सिंधूने पुन्हा कच खाल्ली. ताईने जोरदार पुनरागमन करत तिसरा डाव १२-२१ अशा फरकाने जिंकला.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणा-या ताई यिंगने सिंधूचा तिच्या कारकिर्दित केलेला हा १७ वा पराभव होता. गेल्या सात सामन्यात सिंधूला ताईचा पराभूत करणे जमले नाही. सिंधूने ताई यिंगचा २०१९ ला वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदकाच्या लढतीत पराभव केला होता. त्यानंतर ताईने सिंधूला कायम मात दिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या