मुंबई : जगात काहीही अशक्य नाही असे समजण्यासाठी आता एक पुरावा उपलब्ध झाला आहे. एका अंध असलेल्या युवकाने खतरनाक स्टंट करून लाखो लोकांचे मन जिंकले आहे. आपण जीवनात कामासंदर्भात सतत नकारात्मक कारणे देत असतो. मात्र हा व्हिडिओ पाहून तुमच्यात नक्कीच सकारात्मक उर्जा येणार हे नक्की. सोशल मीडियावर अनेक स्टंटचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ पाहून हे खरे आहेत की नाही, असा प्रश्न पडतो. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून तुम्हाला धडकी भरेल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक अंध मुलगा हातात काठी घेऊन खतरनाक स्टंट करताना दिसत आहे. हा मुलगा स्केटबोर्डवरून उडी मारत पायऱ्यांवरून खाली येतो. हे सगळं करत असताना तो चालाखीनं काठीचा वापर करतो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर हा मुलगा अंध असल्याचा भासही होत आहे. व्हिडीओच्या शेवटी काही मुलं त्याचे कौतुक करतात. त्यावेळी तो थोडा चाचपडतो. काठीचा आधार घेऊन स्केटबोर्ड चालवणाऱ्या या मुलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून या मुलाचे कौतुकही केले जात आहे.
Read More मलबार युद्ध सरावात भारताचे ऑस्ट्रेलियाला निमंत्रण ?