25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeक्रीडाटी २० विश्वचषकासाठी संघ जाहीर

टी २० विश्वचषकासाठी संघ जाहीर

एकमत ऑनलाईन

कोलकाता : येत्या १६ ऑक्टोबर पासून ऑस्ट्रेलियात सुरू होणा-या आयसीसी टी २० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा नुकतीच झाली.

संघात जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल यांनी पुनरागमन केले आहे. तर जखमी जडेजाच्या जागी अक्षर पटेलला संधी मिळाली आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने आशिया कप झाल्यानंतरच संघ जवळपास ९५ टक्के निश्चित झाला असल्याचे सांगितले होते. त्या प्रमाणे आशिया कपमध्ये खेळलेल्या संघात फारसा बदल नाही. भारतीय संघ ५ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होईल.

भारताचा टी २० वर्ल्डकपसाठीचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकिपर), दिनेश कार्तिक (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

स्टँड बाय खेळाडू : मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चाहर.
बीसीसीआयने ऑस्ट्रेलियात होणा-या टी २० वर्ल्डकपसाठीच्या संघाबरोबरच मायदेशात येत्या २० सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या विरूद्ध होणा-या मालिकेसाठी देखील संघ जाहीर केला आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या