26.5 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeक्रीडाक्रमवारीत टीम इंडिया ठरला ‘किंग’!

क्रमवारीत टीम इंडिया ठरला ‘किंग’!

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आयसीसी टी-२० क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थानावर कायम राहिला आहे. भारताचे २६८ रेटिंग गुण आहेत आणि ते दुस-या स्थानावर असलेल्या इंग्लंडपेक्षा तीन गुणांनी पुढे आहेत, ज्यांचे २६५ रेटिंग गुण आहेत. इंग्लंड संघाने टी-२० विश्वचषक जिंकला आहे. त्याचबरोबर अंतिम फेरीत इंग्लंडकडून पराभूत झालेला पाकिस्तान तिस-या स्थानावर आहे.

पाकिस्तानचे २५८ रेटिंग गुण आहेत. भारतीय संघ शुक्रवारपासून न्यूझिलंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. येथे विजय मिळवून भारताला पहिल्या क्रमांकावर आपले स्थान मजबूत करण्याची संधी असेल.

टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ इंग्लंडपेक्षा पाच गुणांनी पुढे होता. भारताचे २६८ रेटिंग गुण होते. त्याचवेळी इंग्लंडचे २६३ गुण होते. त्यानंतर रोहित शर्माच्या खेळाडूंनी ग्रुप स्टेजमधील पाचपैकी चार सामने जिंकले, तर इंग्लंडला फक्त तीन सामने जिंकता आले.

उपान्त्य फेरीच्या सामन्यापूर्वी दोन्ही संघांमध्ये सहा गुणांचा फरक होता. उपान्त्य फेरीत जोस बटलरच्या संघाने एकतर्फी लढतीत भारताचा १० गडी राखून पराभव केला . एमसीजी येथे पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवून टी-२० विश्वचषक उंचावला. आता भारत २६८ गुणांसह अव्वल स्थानावर आहे तर इंग्लंडचे २६५ गुण आहेत. पाकिस्तान २५८ गुणांसह तिस-या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका (२५६) चौथ्या, न्यूझिलंड (२५३) पाचव्या आणि ऑस्ट्रेलिया (२५२) सहाव्या स्थानावर आहे.

एकदिवसीय विश्वचषकाला एक वर्षापेक्षा कमी कालावधी बाकी आहे. अशा स्थितीत टी-२० सामने कमी होतील. मात्र, भारताला न्यूझिलंडला हरवून अव्वल स्थान बळकट करण्याची संधी आहे. जर भारतीय संघाने वेलिंग्टन येथे १८ नोव्हेंबरपासून सुरू होणारी तीन सामन्यांची टी-२० मालिका ३-० अशा फरकाने जिंकली तर भारताचे २६९ रेटिंग गुण होतील. न्यूझिलंडने ही मालिका जिंकली तर भारतीयांना त्यांचे अव्वल स्थान गमवावे लागेल आणि इंग्लंड जगातील नंबर वन टी-२० संघ असेल.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या