23.1 C
Latur
Monday, August 2, 2021
Homeक्रीडाटीम इंडियाच नंबर वन!

टीम इंडियाच नंबर वन!

एकमत ऑनलाईन

दुबई : गेल्या वर्षभरात ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात पराभूत करण्याची दिमाखदार कामगिरी करून दाखवणा-या भारताच्या क्रिकेट संघाने आणखी एक मानाचा तुरा आपल्या शिरपेचात खोवला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कसोटी क्रमवारीत भारतीय संघाने पहिले स्थान कायम राखले आहे. न्यूझिलंडचा संघ दुस-या स्थानावर कायम आहे. आयसीसीच्या वार्षिक अपडेटनंतर भारतीय संघाला एक तर न्यूझिलंडला दोन गुणांचा फायदा झाला.

कसोटी क्रमवारीत भारतीय संघाचे १२१ तर न्यूझिलंडचे १२० गुण आहेत. गेल्या वर्षात भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या देशातच २-१ असे पराभूत करून आस्मान दाखवले. तर इंग्लंडविरुद्धची मायदेशातील मालिका ३-१ च्या मोठ्या फरकाने जिंकली. न्यूझिलंडने घरच्या मैदानावर वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्याविरुद्धची मालिका २-०ने जिंकली होती.

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी दिलेल्या क्रमवारीतील अपडेटमधून २०१७-१८ चे निकाल काढून टाकले आहेत. २०१९-२० मध्ये खेळण्यात आलेल्या सामन्यांचे महत्त्व अर्धे करण्यात आले आहे. ताज्या अपडेटमध्ये मे २०२० नंतर झालेल्या सर्व सामन्यांचे गुण १०० टक्के केले आहेत. तर गेल्या दोन वर्षांतील सामन्यांचे गुण ५० टक्के इतके केले आहेत.

ऑस्ट्रेलियाने २०१७-१८ मध्ये इंग्लंडवर ४-० असा विजय मिळवला होता. हा विजय सध्याच्या क्रमवारीत विचारात घेतला नाही. याचा फायदा इंग्लंडला झाला. ते आता क्रमवारीत तिस-या स्थानावर आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा संघ चौथ्या स्थानावर आहे. इंग्लंडचे १०९ तर ऑस्ट्रेलियाचे १०८ गुण आहेत. क्रमवारीत भारताचा शेजारी पाकिस्तान ५व्या क्रमांकावर, श्रीलंका ८व्या तर बांगलादेश ९ व्या क्रमांकावर आहे.

पुण्यात मांजरीजवळ होणार भारत बायोटेकचा प्रकल्प

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या