सेंट किटस् : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात आज दुसरा टी २० सामना वॉर्नर पार्क मैदानात झाला. सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत केवळ १३८ धावा केल्या. आता वेस्ट इंडीजला जिंकण्यासाठी १२० चेंडूत १३९ धावा करायच्या आहेत. वेस्ट इंडीजच्या ओबेद मकॉय याने अप्रतिम गोलंदाजी करत ६ विकेट्स घेतल्या. त्यामुळे भारताचा संघ स्वस्तात माघारी परतला.
सामन्यात सर्वप्रथम वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकली. त्यावेळी त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो संघातील गोलंदाजांनी योग्य असल्याचे अगदी पहिल्या चेंडूपासून दाखवले. पहिल्याच चेंडूवर भारताचा कर्णदार रोहितला तंबूत धाडण्यात आले. नंतर भारताचे बहुतेक फलंदाज पटापट तंबूत परतत होते. हार्दिक पांड्याने सर्वाधिक ३१ धावा केल्या, तर जडेजा आणि पांड्या यांनी अनुक्रमे २७ आणि २४ धावा केल्या. त्यामुळे भारत १९.४ षटकात १३८ धावाच करू शकला.