24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeक्रीडाटीम इंडिया झिम्बाब्वेला रवाना

टीम इंडिया झिम्बाब्वेला रवाना

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आशिया कप सुरू होण्यापूर्वी टीम इंडिया शनिवारी झिम्बाब्वेला रवाना झाली आहे. भारताला झिम्बाब्वेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. मालिकेतील पहिला सामना १८ ऑगस्टला खेळवला जाईल, तर इतर दोन सामने २० आणि २२ ऑगस्टला होतील. के. एल. राहुल झिम्बाब्वे दौ-यावर टीम इंडियाचा कर्णधार असेल. यासाठी भारतीय संघ शुक्रवारी रवाना झाला. बीसीसीआयने ट्विटरवर प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण, शिखर धवन, दीपक चहर यांच्यासह अनेक खेळाडूंचे फोटो पोस्ट करून याची माहिती दिली.

बीसीसीआयने झिम्बाब्वे दौ-यासाठी ३१ जुलैला १५ जणांचा संघ जाहीर केला होता, त्यावेळी संघाची कमान शिखर धवनकडे सोपवण्यात आली होती. पण काही दिवसांपूर्वी के. एल. राहुलने तंदुरुस्ती चाचणी उत्तीर्ण होऊन केवळ संघात स्थान मिळवले नाही, तर बीसीसीआयने त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारीही सोपवली आहे. या दौ-यावर आता धवन संघाचा उपकर्णधार आहे. झिम्बाब्वे दौ-यावर जाण्यापूर्वी शिखर धवनने त्याच्या फेसबुक स्टोरीवर एक फोटो पोस्ट केला ज्यामध्ये तो विमानतळावर झोपलेला दिसत होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या