33.7 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeक्रीडाऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाचा ८ विकेट राखून पराभव

ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाचा ८ विकेट राखून पराभव

एकमत ऑनलाईन

डलेड : ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याच्या तिस-या दिवशीच आठ विकेट्सनी पराभव केला आहे. सामन्याच्या चौथ्या डावात ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी ९० धावांची गरज होती. ऑस्ट्रेलियाने केवळ दोन विकेट्स गमावत २१ ओव्हर्समध्येच भारताने दिलेले लक्ष्य गाठत विजय आपल्या नावे केला आहे.

भारताने पहिल्या डावात २४४ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी धमाकेदार खेळी करत ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात १९१ धावांवर रोखले़ भारतीय संघ दुस-या डावात ५३ धावांच्या आघाडीसह मैदानावर उतरला होता. परंतु, टीम इंडियाच्या फलंदाजांनी अत्यंत लाजिरवाणी खेळी केली आणि दुस-या डावात केवळ ३६ धावा केल्या.

दुस-या डावात भारतीय फलंदाजांनी अतिशय निराशा केली. पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर मोहम्मद शमीच्या मनगटाला दुखापत झाली आणि तो रिटायर्ट हर्ट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. परिणामी भारताचा डाव अवघ्या ३६ धावांत संपुष्टात आला. भारतीय संघाच्या कोणत्याही फलंदाजाला धावसंख्येचा दुहेरी आकडा गाठता आला नाही. मयांक अग्रवालने सर्वाधिक ९ धावा केल्या. तर हनुमा विहारीला ८ धावा करण्यात यश आले. चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि आर. आश्विनला भोपळाही फोडता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून जोस हेजलवूडने अवघ्या ८ धावा देऊन ५ विकेट्स घेतल्या तर पॅट कमिन्सला २१ धावा देऊन चार विकेट्स मिळवता आल्या.

ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेमध्ये टीम इंडियाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण विराट कोहली पहिल्या सामन्यानंतर मायदेशी परतणार आहे. तसेच टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्माचीही दुस-या कसोटी सामन्यात वापसी होण्याची शक्यता कमी आहे. याव्यतिरिक्त मोहम्मद शमीला दुखापत झाल्यामुळे संघाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात पुढील तीन कसोटी सामने खेळणा-या टीम इंडियासाठी ऑस्ट्रेलियाचे आव्हान थोपवणे कठीण असणार आहे.

जोश हेझलवूडची फाईव्ह स्टार कामगिरी
जोश हेझलवूडने या सामन्यात एकूण ६ विकेट्स घेतल्या. हेझलवूडने पहिल्या डावात १ तर दुस-या डावात ५ विकेट्स घेतल्या. टीम इंडियाला ३६ धावांवर गुंडाळण्यात जोशने निर्णायक भूमिका बजावली. जोशने टीम इंडियाच्या फंलदाजांना सेट होण्याची वेळच दिली नाही. जोशने दुस-या डावात मयांक अग्रवाल, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिद्धीमान साहा आणि आर. आश्विनला बाद केले. जोशच्या या कामगिरीमुळे टीम इंडियाचा पहिला डाव ३६ धावांवर आटोपला.

भारत पुन्हा सर्जिकल स्ट्राईकच्या तयारीत – पाकचे परराष्ट्र मंत्री कुरेशी यांचा आरोप

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या