32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeक्रीडानरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियाने रचला इतिहास

नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियाने रचला इतिहास

एकमत ऑनलाईन

अहमदाबाद : भारतीय संघाने अहमदाबाद कसोटीत इंग्लंडचा दोन दिवसांत पराभव केला. इंग्लंडला पहिल्या डावात ११२ व दुसºया डावात ८१ धावाच करता आल्या. भारताने पहिल्या डावात १४५ धावा करून ३३ धावांची आघाडी घेतली होती आणि ४९ धावांचे माफक लक्ष्य त्यांनी एकही विकेट न गमावता पार केले. अक्षर पटेलने ११ विकेट्स घेतल्या, तर आर अश्विनने ७ बळी टिपले. नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियाने विजय मिळवून दहा मोठे विक्रम नोंदवले.

अक्षर पटेलचा करिष्मा, आर अश्विननंतर असा पराक्रम करणारा दुसरा भारतीय़ अक्षर पटेलने अहमदाबाद कसोटीच्या पहिल्या डावात सहा विकेट्स घेतल्या. कसोटी कारकिर्दीतील त्याचा हा दुसराच सामना आहे. यापूर्वी त्याने चेन्नईतील दुसºया कसोटीतून त्याने पदार्पण करताना पाच विकेटसह एकूण सात विकेट्स घेत इतिहास रचला होता. अहमदाबाद कसोटीच्या दुसºया डावात त्याने पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. ११४ वर्षांनंतर कसोटीतील डावाच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेणारा आर अश्विननंतर तो दुसरा गोलंदाज ठरला़

कसोटीच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारे फिरकी गोलंदाज
बॉबी पील विकेट अ‍ॅलेक बॅनेर्मन, १८८८
अल्बर्ट व्होग्लर विकेट टॉम हेयबर्ड, १९०७
आर अश्विन विकेट रोरी बर्न्स, २०२१
अक्षर पटेल विकेट झॅक क्रॅव्ली, २०२१

इशांत शर्माने १४ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत मारला पहिला षटकार
इशांत शर्माचा हा १०० वा कसोटी सामना होता. कपिल देव यांच्यानंतर १०० कसोटी सामना खेळणारा इशांत हा दुसरा जलदगती गोलंदाज आहे. या सामन्यात इशांतने खणखणीत षटकार खेचला. १४ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीतील त्याचा हा पहिलाच षटकार ठरला. २००७मध्ये इशांतनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने १०० कसोटी, ८० वन डे व १४ ट्वेंटी-२० सामने खेळले आणि त्यात २६७७ चेंडूंचा सामना केला.

जो रुटने गोलंदाजीत दाखवली कमाल
जो रूटनं आजच्या सामन्यात ६.२ षटकांत ८ धावांत ५ विकेट्स घेतल्या. कसोटी क्रिकेटमधील फिरकीपटूनं सर्वात कमी धावांत पाच विकेट्स घेण्याची ही सर्वोत्तम कामगिरी. यापूर्वी १९९२-९३साली टीम मे यानं वेस्ट इंडिजविरुद्ध ९ धावांत ५, तर २००४-०५मध्ये मायकेल क्लार्क यानं भारताविरुद्ध ९ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या. कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधाराची ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. १९२४मध्ये आर्थर गिलिगन यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या. रुटनं ( ५/८) वेस्ट इंडिजचे कर्टनी वॉल्श ( ६/१८ वि. न्यूझीलंड, १९९५) यांचा विक्रम मोडला.

सुपर स्प्रेडर ठरणारी ठिकाणे टार्गेट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या