20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeक्रीडाटी-२०साठी टीम इंडिया ६ ऑक्टोबरला होणार ब्रिस्बेनला रवाना

टी-२०साठी टीम इंडिया ६ ऑक्टोबरला होणार ब्रिस्बेनला रवाना

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ ६ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेली टी-२०मालिका संपल्यानंतर दोन दिवसांनी भारतीय संघ विश्वचषकापूर्वी तयारी शिबिरात सहभागी होणार आहे.

भारत १३ ऑक्टोबरपर्यंत पर्थमध्ये सराव करणार आहे, जिथे ते वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामना खेळतील. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंडविरुद्ध आणखी दोन सराव सामने खेळण्यासाठी ब्रिस्बेनला जातील.

स्टँडबायसह टी-२० विश्वचषक संघातील पाच सदस्यांना ऑस्ट्रेलियात खेळण्याचा अनुभव नाही. सूर्यकुमार यादव, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, दीपक हुड्डा आणि रवी बिश्नोई असे पाच क्रिकेटर आहेत. त्यामुळे हे सामने त्यांना मेगा स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियन परिस्थितीशी जुळवून घेण्यास मदत करतील.

अजूनही दीपक हुड्डा आणि जसप्रीत बुमराह यांच्या फिटनेसबाबत स्पष्टता मिळाली नाही. बुमराह आणि हुड्डा हे दोघेही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेतून बाहेर पडले आहेत. सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये दुखापतीतून सावरत आहेत. आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर २८ वर्षीय बुमराह गेल्या महिन्याच्या शेवटी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२०साठी परत आला होता. पण एनसीएच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या