अपयशी गोलंदाजी, गचाळ क्षेत्ररक्षण ,सोडलेले चार झेल ,आणि फलंदाजीत ही बऱ्यापैकी कामगिरी न करणारा भारतीय संघ ६६ धावांनी पराभूत झाला या पराभवा मध्ये चांगली कामगिरी केली ती सलामीवीर शिखर धवन आणि हार्दिक पंड्या यांनी. बाकी सर्व फलंदाजी अपयशी ठरले कर्णधार कोहली सुद्धा सिडनीवर कधीच कामगिरी करू शकला नाही यावेळी तो२१वर बाद झाला सिडनी क्रिकेट ग्राउंड वर कर्णधार विराट कोहली चे कामगिरी आहे गेल्या चार. सामन्यात तीन, आठ ,एक, तीन. भारतीयांना एकहीअष्टपैलू खेळाडू संघात नसल्याचे जाणीव झाली पाचही गोलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाहीत सहावा गोलंदाज संघात नसल्याने पाचही गोलंदाजाना पूर्ण कोटा गोलंदाजी करावी लागली त्यामानाने गांगारून या संघातील फिरकी गोलंदाज ऍडम झंपाने भारतीय फलंदाजी रोखली तसेही तीनशे चेंडूत ३७५ धावा हे थोडे अशक्यप्राय होत सलामीवीर मयंक आगरवाल आणि शिखर धवन यांनी सुरुवात चांगली केली पण तो जोर पुढे टिकला नाही
आठ महिन्यांनी घरच्या मैदानावरील स्टेडियमचे दरवाजे खुले झाल्यावर आज सिडनीच्या मैदानावर प्रेक्षक आणि धावांनी जोरदार हजेरी लावली. आघाडीच्या चार फलंदाजांनी केलेल्या फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताविरुद्ध विक्रमी धावसंख्येचे आव्हान उभे केले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने निर्धार ५०सषटकांत ६ बाद ३७६ धावा केल्या.
कर्णधार अॅरॉन फिंच, माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांच्या शतकखेळीला डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेलच्या तडाखेबंद खेळीची जोड मिळाली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्धची आजपर्यंतची सर्वौच्च धावसंख्या उभारता आली. ऑस्ट्रेलियाच्या या विक्रमी धावसंख्येचा स्मिथच शिल्पकार ठरला. तरी फिंच आण डेव्हिड वॉर्नर यांनी १५६ धावांची दिलेली भक्कम सलामी विसरता येणार नाही. खरं, तर वॉर्नरही चांगल्या मूडमध्ये होता. मात्र, तो बाद झाला. ही भागीदारी कमी पडली काय म्हणून फिंच आणि स्मिथच्या भागीदारीनेही भारतीय गोलंदाजांच्या नाकी नऊ आणले. जडेजाच्या गोलंदाजीवर पायचित बाद दिल्याचा कौल तिसऱ्या पंचांनी रद्द ठरवला आणि यानंतर स्मिथने भारतीय गोलंदाजांना धुवून काढले.
स्मिथ आणि फिंच जोडीने १०८ धावांची भागीदारी केली. या वेळी फिंच बाद झाला. फिंच बाद झाल्याचा आनंद भारताला फार टिकवता आला नाही. कारण त्यानंतर स्मिथला दुसऱ्या बाजूला ठेवत मॅक्सवेलने टोलेबाजी करत भारतीय गोलंदाांच्या मर्यादा उघड केल्या. तो लवकर बाद झाला. पण, त्यापूर्वी त्याने १९ चेंडूंतच ४५ धावांचा तडाखा दिला. स्मिथ-मॅक्सवेलच्या भागीदारीत स्मिथचा वाटा ११ धावांचा होता. अखेरच्या टप्प्यात मग स्मिथने बॅट सरसावली आणि केरीला हाताशी धरत २५ चेंडूंत ४१ धावांची भर घातली. या भागीदारीत स्मिथने आपले शतक साजरे केले. सुअखेरच्या षटकापर्यंत स्मिथ टिकल्याने ऑस्ट्रेलियाला ही मोठी धावसंख्या सहज शक्य झाली.
ऑस्ट्रेलियाचा प्रत्येक फलंदाज आपले योगदान देत असताना इकडे भारताचा प्रत्येक गोलंदाज अपयशी ठरला. त्याचबरोबर त्यांचे क्षेत्ररक्षणही खराब झाले. सोडलेले झेल आणि मिस फिल्ड यामुळे त्यांना ऑस्ट्रेलियाला रोखण्यात अपयश आले.
जांभळ्या रंगाच्या स्केचपेनचेच मतदान वैध