अहमदाबाद : टीम इंडियाने इंग्लंडवर चौथ्या कसोटीत एक डाव आणि २५ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने ही कसोटी मालिका ३-१ च्या फरकाने ंिजकली. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यातही धडक मारली. भारताने इंग्लंडला दुस-या डावात १३५ धावांवर रोखले. दुस-या डावात टीम इंडियाकडे १६०धावांची आघाडी होती. इंग्लंडला १३५ धावांवर रोखल्याने भारताने डावासह २५ धावांनी विजय मिळवला. भारताच्या आर अश्विन आणि अक्षर पटेल या फिरकी जोडीनेच इंग्लडला ऑल आऊट केले़ या दोघांनी फाईव्ह स्टार कामगिरी केली. या दोघांनी दुस-या डावात प्रत्येकी ५ विकेट्स घेतल्या. या सामन्यात अश्विनने एकूण ८ तर अक्षरने ९ विकेट्स मिळवल्या. तसेच या जोडीने या मालिकेत एकूण ७० पैकी ५९विकेट्स घेतल्या.
फिरकीवर इंग्लंडला गिरकी
या जोडीने संपूर्ण मालिकेत आपल्या फिरकीने इंग्लंडला नाचवलं. अश्विन आणि अक्षरने या सीरिजमध्ये एकूण 59 विकेट्स घेतल्या. यापैकी ३ विकेट्स या अश्विनने घेतल्या. तर अक्षरने 27 विकेट्स मिळवल्या. या दरम्यान दोघांनी अनेकदा 5 विकेट्सही घेतल्या.
अश्विनची ऑलराऊंड खेळी
अश्विनने या संपूर्ण मालिकेत एकूण ३२ विकेट्स घेतल्या. त्याने यादरम्यान ४००विकेट्स घेण्याचा किर्तीमान केला. सोबतच अश्विनने चेन्नईतील दुस-या कसोटीत शतकी खेळी केली. अश्विनने या संपूर्ण मालिकेत १८९ धावाही केल्या. अश्विनला त्याने केलेल्या या अष्टपैलू कामगिरीसाठी मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अक्षर पटेलची शानदार कामगिरी
अक्षर पटेलने दुस-या कसोटीतून पदार्पण केलं.त्याने पदार्पणातील सामन्यापासून आपल्या फिरकीने पाहुण्या इंग्लंडला नाचवलं. त्याने या मालिकेतील एकूण २७ विकेट्स घेतल्या. तसेच त्याने एकूण ४ वेळा ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली. यासह अक्षर पदार्पणातील मालिकेत २७ विकेट्स घेणारा तिसरा भारतीय ठरला. याआधी टीम इंडियाकडून दिलीप दोशी आणि शिवलाल यादव या दोघांनी अशी कामगिरी केली होती.
कसोटीनंतर रंगणार टी २० चा थरार
दरम्यान आता कसोटी मालिकेनंतर टी २० सीरिजचा थरार रंगणार आहे. या मालिकेत एकूण ५ सामने खेळवण्यात येणार आहेत. या सर्व सामन्यांचे आयोजन अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. १५ मार्चपासून या टी २० मालिकेला सुरुवात होणार आहे.
घाटंग्री शिवारात बिबट्याचा मृत्यू, शवविच्छेदनानंतर समजेल मृत्यूचे नेमके कारण