27.3 C
Latur
Monday, January 30, 2023
Homeक्रीडाटेनिस सम्राज्ञी मार्टिनाला कॅन्सर

टेनिस सम्राज्ञी मार्टिनाला कॅन्सर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिग्गज टेनिसपटू मार्टिना नवरातिलोव्हा १२ वर्षांनंतर पुन्हा कॅन्सरच्या विळख्यात आली आहे. यावेळी तिला दुहेरी फटका बसला आहे. नवरातिलोव्हा यांना आता स्तन आणि घशाचा कर्करोग झाला आहे.

६६ वर्षीय मार्टिनाला २०१० मध्ये कर्करोगाचे निदान झाले होते. त्यानंतर त्यांनी सहा महिन्यांत स्टेज कॅन्सरवर मात केली होती. ती म्हणाली की दोन्ही कर्करोग बरे होण्यायोग्य आहेत आणि तिला अनुकूल निकालाची प्रतीक्षा आहे.

१८ वेळची ग्रँडस्लॅम एकेरी चॅम्पियन नवरातिलोव्हा म्हणाली, ‘दुहेरी धक्का गंभीर आहे, परंतु नक्की तो बरा होईल.’ मी अनुकूल निकालाची वाट पाहत आहे. नवरातिलोव्हाला फोर्ट वर्थ टेक्सास येथे नोव्हेंबरच्या डब्ल्यूटीए फायनल दरम्यान घशाचा त्रास जाणवला. यानंतर त्यांची बायॉप्सी करण्यात आली, ज्यामध्ये घशाच्या कर्करोगाची माहिती मिळाली. चाचणीदरम्यान नवरातिलोव्हाला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे समोर आले. आता तिला ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये कॉमेंट्री करता येणार नाही. त्यांना ही स्पर्धा दुरूनच पाहावी लागणार आहे.

नवरातिलोव्हाने तिच्या कारकीर्दीत चारही ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली आहेत. याशिवाय तिने आठ वेळा टूर फायनल्सवर कब्जा केला आहे. नवरातिलोव्हाने १९८१, १९८३ आणि १९८५ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली होती. त्याचबरोबर १९८२ आणि १९८४ मध्ये तिने फ्रेंच ओपन जिंकण्यात यश मिळवले होते. नवरातिलोव्हाने विम्बल्डन ओपनमध्ये सर्वाधिक यश मिळवले होते. तिने नऊ वेळा हे विजेतेपद पटकावले.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या