24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeक्रीडा8 जुलैपासून कसोटी मालिका सुरू : कोरोनानंतर पहिल्यांदाच होणार क्रिकेट सामना

8 जुलैपासून कसोटी मालिका सुरू : कोरोनानंतर पहिल्यांदाच होणार क्रिकेट सामना

एकमत ऑनलाईन

इंग्लंड विरुद्ध वेस्टइंडिज मालिकेच्या वेळापत्रकाची घोषणा

मुंबई, 2 जून : कोरोना व्हायरसमुळे जगभरातील बहुसंख्य देशांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं. या व्हायरसच्या पादुर्भावाचा परिणाम क्रिकेटविश्वावरही झाला आणि क्रिकेटच्या अनेक लोकप्रिय मालिका रद्द करण्यात आल्या. मात्र आता पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांना सुरुवात होणार असल्याचं दिसतंय. कारण इंग्लंड विरुद्ध वेस्टइंडिज मालिकेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे.

इंग्लंडमध्ये होत असलेल्या या मालिकेला 8 जुलैपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील सर्व सामने रिकाम्या स्टेडिअममध्ये खेळवण्यात येणार आहेत. तीन सामन्यांची ही कसोटी मालिका कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या भागात खेळवण्यात येणार आहे. पहिला सामना 8 ते 12 जुलै यादरम्यान साउथॅम्पटन इथं होणार आहे. त्यानंतर दुसरा आणि तिसरा कसोटी सामना अनुक्रमे 16 जुलै ते 20 जुलै आणि 24 जुलै ते 28 जुलै रोजी खेळवण्यात येईल.

Read More  अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारच, राज्यपालांची भूमिका, विद्यापीठ कायद्याची सरकारला आठवण

‘आमचं मुख्य लक्ष्य हे खेळाडू, संघ व्यवस्थापन आणि इतर कामगार यांची सुरक्षितता आमच्यासाठी महत्त्वाची आहे. आम्ही सतत सरकार आणि मेडिकल टीमच्या संपर्कात आहोत. हे प्रस्तावित वेळापत्रक असून सरकारकडून शिक्कामोर्तब झाल्यानंतर याला अंतिम स्वरूप येणार आहे,’ असं इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.दरम्यान, भारतीय क्रिकेट रसिकही आपल्या संघाचे क्रिकेट सामने पाहण्यासाठी इच्छुक आहे. मात्र देशातील कोरोनाची स्थिती लक्षात घेता पुढील अनेक दिवस ते शक्य होणार नसल्याचं दिसत आहे. भारतातील सर्वात लोकप्रिय मानली जाणार इंडियन प्रिमिअर लीग ही क्रिकेट मालिकाही कोरोनामुळे होऊ शकलेली नाही.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या