33.7 C
Latur
Monday, March 1, 2021
Home क्रीडा ‘ठाकूर-सुंदर’ जोडीची १२३ धावांची सर्वाेच्च भागीदारी

‘ठाकूर-सुंदर’ जोडीची १२३ धावांची सर्वाेच्च भागीदारी

एकमत ऑनलाईन

ब्रिस्बेन : आॅस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील चौथ्या सामन्यातील तिसºया दिवसावर टीम इंडियाच्या वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर या जोडीने छाप सोडली. टीम इंडियाचे टॉपचे फलंदाज अपयशी ठरले. यामुळे भारताची ६ बाद १८६ अशी स्थिती झाली. मात्र यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूरने शानदार शतकी कामगिरी करत टीम इंडियाचा डाव सावरला. १२३ धावांची शतकी भागीदारी केली. यादरम्यान दोघांनी अर्धशतक लगावले़ यासह या दोघांनी काही रेकॉर्ड ब्रेक केले. तसेच काही विक्रमांची बरोबरीही केली.

वॉशिंग्टन-शार्दुलचे ‘सुंदर’ रेकॉर्ड
ब्रिस्बेनमध्ये टीम इंडियाकडून सातव्या विकेट्ससाठी सर्वोच्च भागीदारी ठरली. शार्दुल आणि वॉशिंग्टन या नवख्या जोडीने सातव्या विकेटसाठी १२३ धावा जोडल्या. यासह या दोघांनी ब्रिस्बेनवरील टीम इंडियाच्या ३० वर्षांपूर्वींच्या भागीदारीचा विक्रम मोडीत काढला. याआधी टीम इंडियाकडून ब्रिस्बेनमध्ये सातव्या विकेटसाठी ३० वर्षांपूर्वी १९९१ मध्ये ५८धावांची सर्वोच्च भागीदारी करण्यात आली. मनोज प्रभाकर आणि कपिल देव या जोडीने ही भागीदारी केली होती.

वॉशिंग्टनची ७३ वर्षांपूर्वीच्या विक्रमाची बरोबरी
वॉशिंग्टनने पदार्पणातील सामन्यात गोलंदाजी करताना शानदार ३ विकेट्स घेतल्या. यानंतर फलंदाजी करताना झुंजार अर्धशतक लगावले. पदार्पणात अशी कामगिरी करणारा सुंदर दुसरा भारतीय ठरला आहे. तसेच त्याने ७३ वर्षांपूर्वीच्या विक्रमाची बरोबरी केली. टीम इंडियाकडून १९४७ मध्ये दत्तू फडकर यांनी आॅस्ट्रेलियाविरोधात पदार्पणातील सामन्यात अशीच कामगिरी केली होती.

वॉशिंग्टन आणि शार्दुलने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तसेच अर्धशतकही लगावली. क्रिकेट इतिहासात तब्बल ७० वर्षांनंतर असा योग जुळून आला. टीम इंडियाकडून १९५१ मध्ये वीनू मंकड आणि दत्तू फडकर यांनी इंग्लंडविरोधातील कोलकाता कसोटीत अशी अष्टपैलू कामगिरी केली होती.

अति ‘सुंदर’ कामगिरी
वॉशिंग्टनने ६२ धावा केल्या. यासह सुंदर आॅस्ट्रेलियामध्ये पदार्पणातील सामन्यात ७ व्या क्रमांकावर सर्वोच्च धावा करणारा फलंदाज ठरला. सुंदरने यासह राहुल द्रविडच्या कामगिरीची पुनरावृत्ती केली. सुंदर राहुल द्रविडनंतर पदार्पणातील सामन्यात ७ व्या क्रमांकावर येत अर्धशतक लगावणारा दुसरा खेळाडू ठरला. द्रविडने १९९६ मध्ये कसोटी पदार्पण केले. द्रविडने या पदार्पणातील सामन्यात ९५ धावांची खेळी केली. मयंक अग्रवालने पहिल्या डावात शानदार ३८ धावा केल्या. यामध्ये त्याने एक जोरदार सिक्स खेचला. यासह मयंकच्या नावे खेळलेल्या एकूण डावांपेक्षा अधिक सिक्स मारण्याचा विक्रम झाला. मयंकने आतापर्यंत एकूण २२ डावांमध्ये फलंदाजी केली आहे. तर एकूण २३ कसोटी सिक्स त्याने लगावले आहेत.

गंडांतर टळले, ‘हनी ट्रॅप’चे धोके कळले !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या