25.5 C
Latur
Monday, September 27, 2021
Homeक्रीडादिग्गज खेळाडूंचे आव्हान संपुष्टात

दिग्गज खेळाडूंचे आव्हान संपुष्टात

एकमत ऑनलाईन

टोकयो : टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सोमवारचा दिवस निराशाजनक ठरला. टेबल टेनिस, टेनीस, शूटींग, तिरंदाजी, आणि बॅडंिमटन या पाच खेळात भारतीय खेळाडूंचा पराभव झाला. देशांतर्गत स्तरावरील चॅम्पियन असलेल्या या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही जोरदार कामगिरी करत ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले होते. त्यामुळे त्यांच्याकडून पदकाच्या अपेक्षा होत्या. या खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये निराशा केली.

महिला टेबल टेनिसमधील भारताची एकमेव आशास्थान असलेली भारताची मानिका बात्रा तिस-या फेरीत पराभूत झाली. मानिकाचा ऑस्ट्रियाच्या सोफिया पोल्कानोवानं पराभव केला. सोफियानं मानिकाचा ११-८, ११-२, ११-५, ११-७ असा चार सरळ गेममध्ये पराभव केला. मानिकानं रविवारी पहिले दोन गेम पराभूत झाल्यानंतर जिद्दीनं पुनरागमन करत तिसरी फेरी गाठली होती. या फेरीत तिची जादू चालली नाही.

टेनिसमध्ये निराशा
भारताचा टेनिस स्टार सूमित नागलचे आव्हान दुस-या फेरीत संपुष्टात आले. रशियाच्या डेनियल मेदवदेवनं सूमितचा ६-२,६-१ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. वर्ल्ड नंबर २ मेदवदेव विरुद्ध विजयासाठी मोठ्या चमत्काराचीच सूमितला गरज होती. टेनिसमध्ये महिला दुहेरीत भारताचे आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे.

तिरंदाजांचा पराभव
भारताच्या पुरुष तिरंदाजांनी पहिली मॅच जिंकून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला होता. प्रवीण जाधव अतनू दास आणि तरुणदीप राय या भारतीय टीमचा दक्षिण कोरियाच्या टीमनं तीन सरळ सेटमध्ये पराभव केला.

बॅडमिंटनमध्ये पराभव
बॅडमिंटनमध्येही भारताची निराशा झाली. सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही दुहेरीतील भारतीय जोडी पहिल्याच फेरीत पराभूत झाली. इंडोनेशियाच्या वर्ल्ड नंबर वन गिडियोन फर्नाल्डी आणि केविन संजया सुकामुल्जो या जोडीनं त्यांचा २१-१३, २१-१२ असा सरळ गेममध्ये पराभव केला.

शूटर्सचा निशाणा चुकला
भारतीय शूटर्सकडून या स्पर्धेत मोठी अपेक्षा होती. सलग तिस-या दिवशी त्यांना मेडल मिळवण्यात अपयश आले. स्कीट शूटींगमध्ये अंगद वीर सिंह आणि मेराज अहमद यांचा पहिल्याच फेरीत पराभव झाला. अंगद वीर सिंहने १९ वा क्रमांक पटकावला. मेराज अहमदची कामगिरी तर आणखी निराशाजनक झाली. तो २५ व्या क्रमांकावर फेकला गेला.

महामार्गावरील दारू दुकानांना परवानगी नाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या