21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeक्रीडाआजपासून वर्ल्ड चॅम्पियनची लढत रंगणार

आजपासून वर्ल्ड चॅम्पियनची लढत रंगणार

एकमत ऑनलाईन

लंडन : भारत-न्यूझीलंडमध्ये शुक्रवार दि. १८ जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी भारताने प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. यामध्ये अपेक्षेप्रमाणे रविंद्र जाडेजा आणि मोहम्मद शमीचा समावेश करण्यात आला असून मोहम्मद सिराजला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना उद्यापासून सुरू होत असून भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ आमनेसामने आहेत. इंग्लंडच्या साउथँप्टनमधील एजियास बाउल मैदानात हा सामना रंगणार आहे. या लढतीसाठी बीसीसीआयने प्लेइंग इलेव्हन जाहीर केले आहे. त्यामध्ये विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी यांचा समावेश आहे.

न्यूझिलंडचा कॅप्टन केन विल्यमसन आणि भारताचा कॅप्टन विराट कोहली हे आयसीसीच्या सलग दुस-या इव्हेंटमध्ये नॉकआउट मॅचमध्ये आमने-सामने असणार आहेत. या सामन्यासाठी आयपीएल आणि इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये अपयशी ठरलेल्या शुभमन गिलला संधी देण्यात आली आहे. गिल रोहित शर्मासोबत ओपनिंगला येईल. त्यामुळे ही सलामीची जोडी कशी जमते, यावर ब-याच गोष्टी अवलंबून असणार आहेत. रोहित शर्मा याच्याकडून या लढतीत ब-याच अपेक्षा आहेत. त्याला शुभमन गिलची साथही महत्त्वाची ठरणार आहे.

भारतीय टीमने हनुमा विहारी, ऋद्धिमान साहा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, केएल राहुल, शार्दुल ठाकूर, मयंक अग्रवाल, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांना फायनलसाठी निवडलेले नाही. केएल राहुल आणि मयंक अग्रवाल सध्या शानदार फॉर्ममध्ये आहेत. आयपीएलमध्ये पंजाबकडून ओपनिंग करणा-या या दोघांनी उत्कृष्ट बॅटिंग केली होती. केएल राहुलने सराव सामन्यात शतक केले, तर मयंक अग्रवालचे टेस्ट रेकॉर्डही चांगले आहे. मयंकने टेस्ट क्रिकेटमध्ये दोन द्विशतकेही केली आहेत, पण तरीही विराटने या दोघांवर विश्वास दाखवला नाही.

भारतात नोवोवॅक्सचा लहान मुलांना आधार !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या