22.3 C
Latur
Wednesday, August 17, 2022
Homeक्रीडाइंग्लंडविरुद्ध पहिला टी-२० सामना आज

इंग्लंडविरुद्ध पहिला टी-२० सामना आज

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात निराशाजनक कामगिरी केल्यानंतर भारतीय संघ इंग्लंडश तीन सामन्यांची टी- २० मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. या मालिकेतील पहिला टी-२० सामना आज साउथॅम्प्टनच्या रोज बाऊल येथे खेळला जाणार आहे.

येत्या ऑक्टोबर-नोव्हेबर महिन्यांत ऑस्ट्रेलियात आगामी टी-२० विश्वचषक खेळला आहे. याच पार्श्वभूमीवर इंग्लंडविरुद्ध टी-२०मालिका जिंकून भारतीय संघ आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करेल. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने टी-२०क्रिकेटमध्ये उत्तम प्रदर्शन करून दाखवले.

यापुढे भारत अशीच कामगिरी करेल, अशी अपेक्षा केली जात आहे. भारतीय संघासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली अतिशय महत्वाचे खेळाडू मानले जातात. भारत अडचणीत असताना या दोघांनी अनेकदा महत्वाची भूमिका बजावत संघाला विजय मिळवून दिला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या