21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeक्रीडाआशिया कपसाठी खेळाडूंची होणार फिटनेस टेस्ट

आशिया कपसाठी खेळाडूंची होणार फिटनेस टेस्ट

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आशिया कपसाठी निवडलेला संघ बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव करणार आहे. याचदरम्यान, संघाची फिटनेस टेस्ट देखील होणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली यांना देखील फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे.

ही फिटनेस चाचणी एनसीएमध्ये १८ ऑगस्ट रोजी होणार असून संघ २० ऑगस्टला यूएईला रवाना होईल. त्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी एक आरोग्य तपासणी देखील होणार आहे.

दरम्यान यंदाचा आशिया कप हा यूएईमध्ये २७ ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. भारत आशिया कपमध्ये आपले अभियान २८ ऑगस्ट रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. आशिया कपमध्ये भारताला टी २० वर्ल्डकपमधील पराभवाचे उट्टे काढण्याची संधी आहे. यूएईमध्येच झालेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने भारताचा इतिहासात पहिल्यांदाच पराभव केला होता.

आशिया कपसाठीचा भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, यझुवेंद्र चहल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, आवेश खान.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या