25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeक्रीडासुवर्णपदकाच्या दावेदारांना रौप्यपदकावर समाधान मानवे लागले

सुवर्णपदकाच्या दावेदारांना रौप्यपदकावर समाधान मानवे लागले

एकमत ऑनलाईन

  सौरव गांगुलीचे महिला क्रिकेट संघासाठी ट्विट
नवी दिल्ली : कॉमनवेल्थ क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून ९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. ज्यामुळे भारतीय संघाला रौप्यपदकावर सामाधान मानावे लागले आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत भारतासमोर १६२ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात भारतीय संघ १५२ धावांवर ढेपाळला.

दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेट महिलांसाठी एक ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी कॉमनवेल्थ स्पर्धेत रौप्यपदक जिंकलेल्या महिला संघाचे कौतुक केले. तसेच त्यांचे कानही पिळले आहेत.

सौरव गांगुली काय म्हणाले?
कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय क्रिकेट महिलांनी रौप्यपदक जिंकले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. परंतु, ते निराश होऊन मायदेशात परतणार आहेत. कारण हा सामना पूर्णपणे त्यांचा होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या