30.5 C
Latur
Monday, March 1, 2021
Home क्रीडा पाहुण्यांशी लढण्यास यजमान सज्ज

पाहुण्यांशी लढण्यास यजमान सज्ज

एकमत ऑनलाईन

ऑस्ट्रेलियातील मालिका विजयानंतर मायदेशात इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात पराभवास सामोरे जावे लागले. अजिंक्य राहणारा भारत इतक्या लवकर जमिनीवर उतरेल असं वाटलं नव्हतं. भारतात येऊन त्यांच्याच फिरकीच्या हुकमी अस्त्राला बोथट करून इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात २२७ धावांनी दणदणीत विजय मिळविला. शनिवार पासून दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यास सुरवात होत आहे. तेव्हा इंग्लंडचा सामना करण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे. या कसोटी सामन्यासाठी प्रथमच पन्नास टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची मान्यता दिली आहे. त्यामुळे या वेळी किमान प्रेक्षकांसमोर भारतीय संघ आपला खेळ उंचावतील अशी अपेक्षा धरूनच हे प्रेक्षक मैदानात उपस्थित राहतील. तसेच या सामन्यापासून पत्रकार कक्षा त ही परवानगी देण्यात आली आह

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड संघात बदल दिसून येतील. यष्टिरक्षक म्हणून बेन फेक्स, तर वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड या सामन्यात खेळणार आहेत. बटलरला मायदेशी पाठविण्यात आल्यामुळे फोक्स संघात येईल. रोटेशन पद्धतीचा अवलंब करताना जेम्स अँँडरसनला विश्रांती देऊन ब्रॉडचा समावेश केला जाईल. जखमी जोफ्रा आर्चरची जागा ख्रिस वोक्स घेईल. आर्चर जखमी असला, तरी तिसऱ्या कसोटीसाठी तो उपलब्ध असेल, अशी आशा इंग्लंड कर्णधार ज्यो रुट याने व्यक्त केली. दुपारी उपकर्णधार अजिंक्य रहाणे पत्रकार परिषदेला झूम वर उपस्थित होता पहिल्या कसोटीत वापरण्यात आली तशी खेळपट्टी या वेळी नसेल.

या वेळी वापरण्यात येणारी खेळपट्टी ही पहिल्या दिवसापासून पासूनच फिरकीला साथ देईल असे सांगण्यात येत आहे. त्यासाठी भारताकडून अश्विनला सहाय्यक फिरकी गोलंदाजांनी साथ देणे आवश्यक आहे. शाहबाज नदीम ऐवजी अक्षर पटेलला स्थान मिळेल. चायनामन कुलदीप यादवला संधी मिळेल की नाही याबाबत अजून शंकाच आहे. फलंदाजी अधिक बळकट करण्याच्या दृष्टिने भारतीय संघ व्यवस्थापन वॉशिंग्टन सुंदर तंबूत ठेवून हार्दिक पंड्याला खेळविण्याची शक्यता आहे. तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून त्याला खेळविण्यास संघ व्यवस्थापन राजी नाही आणि आक्रमक फिरकी गोलंदाज म्हणून त्यांचा कुलदीपवर विश्वास नाही. त्यामुळे गोलंदाजी करू शकणारा आणि आक्रमक फलंदाजी करू शकणाऱ्या हार्दिकला संघ व्यवस्थापन संधी देईल

पहिल्या कसोटीतला अनुभव लक्षात घेता भारतासमोर आता खेळपट्टीबाबत दोन पर्याय उपलब्ध असतील. त्यातला पहिला म्हणजे खेळपट्टीवर पाणी मारायचे आणि खेळपट्टीवर दोन्ही बाजूने चेंडू सीमवर पडून मुव्ह करण्याची क्षमता असलेल्या ब्रॉडचा सामना करायचा. दुसरा पर्याय म्हणजे खेळपट्टीवरील गवत काढून त्यावर कमी प्रमाणात पाणी मारायचे. यामुळे चेंडूला उसळी मिळेल आणि खेळपट्टी शक्य तितक्या लवकर खराब होईल.पण, असे करताना जुन्या आठवणी आठवाव्या लागतील. अशा खेळपट्टीवर भारताला प्रतिस्पर्ध्यांनी धडा शिकवला आहे. अशाच प्रकारच्या खेळपट्टीवर २०१७ मध्ये पुण्यात स्टिव्ह स्मिथने भारतीय गोलंदाजीचा समाचार घेतला होता.

२०१२ मध्ये मुंबईत केविन पीटरसनने १८६ धावांची खेळी केली होती. त्या वेळी भारत केवळ झहीर खान या एकमेव वेगवान गोलंदाजासह अश्विन आणि प्रग्यान ओझा यांना घेऊन खेळले होते. या दोन्ही सामन्यात प्रतिस्पर्धी फिरकी गोलंदाज स्टिव ओकिफ आणि ग्रॅम स्वान, मॉंटी पानेसर यांनी भारतीय फलंदाजीला खिंडार पाडले होते.पुन्हा या खेळपट्टीवर नाणेफेक महत्वाची ठरणार आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यावर दोन्ही कर्णधारांचा कल असेल तसेच कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी इंग्लंडचे तिकिट बुक करण्यासाठी दोन्ही संघ सारखेच प्रयत्न करतील. त्यासाठी इंग्लंड काय किंवा भारत काय दोघांना विजय हा आवश्यक आहे. सामना अनिर्णित राहिल्यास त्यांच्याच समोरील आव्हान कठिण होणार आहे.

माझी पक्षात घुसमट होते; तृणमूल खासदाराची राज्यसभेत राजीनाम्याची घोषणा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या