चेन्नईतील दुस-या कसोटीच्या दुस-या दिवसअखेर यजमान टीम इंडियाने २४९ धावांची आघाडी पाहुण्यांवर घेतली आहे त्यामुळे यजमान टीम इंडिया जा विजय जवळजवळ निश्चित आहे कारण भारताचे अजून नऊ फलंदाज बाद व्हायचे आहेत आणि तीन दिवसाचा खेळ बाकी आहे. सामन्यात पाहुण्यांना विजय मिळवणे दुरापास्तच. कसोटीमध्ये निकालाचा असणारा तिसरा ऑप्शन सामना अनिर्णित राहणे हे तर अगदीच अशक्य. इंग्लंडचा पराभव टाळण्यासाठी एखादा चमत्कारच घडावे लागेल किंवा निसर्ग राजाला मद्रासच्या मैदानावर वादळच आणावे लागेल
दुसरा दिवस गाजवला तो गोलंदाजांनी आजच्या दिवसात तब्बल १५ विकेट पडल्या. यजमानांच्या पहिल्या डावातील चार,इंग्लंडचा संपूर्ण डाव आणि दुस-या डावातील शुभमन गिलचा बळी. फिरकी गोलंदाजानी अक्षरश: धुमाकूळ घातला काल रोहित शर्माने केलेल्या १६१ धावा सुद्धा पाहुण्यांना करता आल्या नाहीत त्यांचा डाव १३४ धावातच गुंडाळला गेला आणि त्याचं श्रेय जातं ते रविचंद्रन अश्विनच्या फिरकीला. त्याने ४३ धावांत पाच बळी घेण्याचा पराक्रम एकोणतिसाव्या वेळा केला.कसोटी पदार्पण करणा-या अक्षर पटेल ला पहिल्या कसोटीत द्विशतक (२१८)करणारा कर्णधार रूटचा बळी मिळाला .एवढे मात्र झाले की पाहुण्यांनी फॉलोऑन वाचवला आणि यजमानांना १९५ धावांची आघाडी मिळाली इंग्लंडच्या पहिल्या डावात इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज यांनी फक्त दहा षटके टाकली यावरूनच या सामन्यातील फिरकीच वर्चस्व लक्षात येते इंग्लिश फलंदाजांनी अश्विन आणि अक्षर पटेल समोर अक्षरश: नांगी टाकली त्यांच्यातील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला यष्टीरक्षक बेन फोक्स तो ४२ धावा करून नाबाद राहिला.
ही खेळपट्टी कठीण आणि नव्या चेंडू साठी मदतआहे खूप जुना आणि चेंडू मऊ झाल्यावर त्याला एवढी खेळपट्टी कडून मदत मिळत नाही पाहुण्यांचे मधली फळी बेन स्टोक्स (२२) फॉक्स(४२)ओली पोप(१८) यांनी फलंदाजीचा प्रयत्न केला पण तेही अश्विन समोर जास्त टिकाव धरू शकले नाहीत पहिल्या कसोटीत फिरकीसमोर जो रूटन स्वीपच्या फटक्यावर जास्त धावा जमवल्या होत्या त्याचाच वापर भारतीय फलंदाज रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी केला होता दुस-या डावातही रोहित शर्माला तिस-या पंचांनी जीवदान मिळाले खरंतर मोईन अलीच्या चेंडूवर तो पायचित होता कारण त्यांनी खेळण्याचा प्रयत्नच केला नव्हता पण त्याला अनिल चौधरी या तिस-या पंचांनी नाबाद ठरवले
दुस-या डावात रोहित शर्मा नाबाद २५ व चेतेश्वर पुजारा खेळत आहेत कर्णधार विराट कोहली उपकर्णधार अजिंक्य रहाणे ऋषभ पंत हे सर्व जण तिस-या दिवशी आघाडी जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करतील या आखाडा झालेल्या खेळपट्टीवर चौथ्या डावात पाहुण्यांना साडेतीनशे धावांचे लक्ष्यही अशक्यप्राय असेल या विजयामुळे भारतीय संघाचे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील स्थान भक्कम होईल
प्रेमाची नवी व्याख्या सांगणारा ‘लव्ह यू मित्रा’