18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeक्रीडाआयर्लंडच्या खेळाडूने विराटचा विक्रम मोडला

आयर्लंडच्या खेळाडूने विराटचा विक्रम मोडला

एकमत ऑनलाईन

मुंबई : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली हा भारताचाच नाही तर जगातील आघाडीचा बॅटर आहे. क्रिकेटमधील तिन्ही प्रकारात त्याने सातत्याने रन काढले आहेत. क्रिकेटमधील अनेक रेकॉर्ड हे विराटच्या नावावर आहेत. त्याचा एखादा रेकॉर्ड मोडला तर ती कोणत्याही खेळाडूसाठी मोठी गोष्ट असते. टी २० क्रिकेटमधील विराटचा एक महत्त्वाचा रेकॉर्ड आयर्लंडच्या खेळाडूने मोडला आहे. आयर्लंडचा स्टार बॅटर पॉल स्टर्लिंग याने ही कामगिरी केली आहे.

विराटचा टी २० क्रिकेटमधील सर्वाधिक फोर लगावण्याचा रेकॉर्ड त्याने मागे टाकला आहे. आता आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक फोर लगावणारा स्टर्लिंग हा बॅटर बनला आहे. त्याने रविवारी यूएई विरुद्ध हा विक्रम केला आहे. स्टर्लिंगने या मॅचमध्ये ३५ बॉलमध्ये ४० रन काढले. या खेळीत त्याने ४ फोर लगावले. स्टर्लिंगचे आता आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये २८८ फोर झाले आहेत. तर विराटच्या नावावर २८५ फोर आहेत. विशेष म्हणजे त्याने ही कामगिरी विराटपेक्षा कमी मॅचमध्ये पूर्ण केली आहे. विराटने ९० मॅचमध्ये २८५ फोर लगावले आहेत. तर स्टर्लिंग ८९ आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये ही कामगिरी केली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या