Sunday, September 24, 2023

४ सप्टेंबरपासून कांगारुंच्या इंग्लंड दौ-याला सुरूवात

नवी दिल्ली: तब्बल ४ महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा एकदा सुरु झालं आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका यांच्यात सध्या ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यानंतर पाकिस्तान आणि इंग्लंडचा संघ कसोटी आणि टी-२० सामन्यांची मालिका खेळेल. प्रतिष्ठीत युरोपियन फुटबॉल लिग स्पर्धा सुरु झालेल्या असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटही हळुहळु रुळावर येतंय. ४ सप्टेंबरपासून आॅस्ट्रेलियाचा संघही इंग्लंडमध्ये मर्यादीत षटकांच्या क्रिकेट सामन्यांची मालिका खेळणार आहे.

आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे दोन्ही संघ ४ सप्टेंबरपासून ३ वन-डे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळतील असं टेलिग्राफने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. ४, ६ आणि ८ या तारखांना टी-२० तर १०,१२ आणि १५ तारखेला वन-डे सामने खेळवले जातील. आॅस्ट्रेलियन खेळाडू खासगी जेट विमानाने इंग्लंडला पोहचतील, आणि त्यानंतर साऊदम्पटन आणि मँचेस्टरच्या मैदानावर ही मालिका रंगेल. साऊदम्टन आणि मँचेस्टर या दोन्ही ठिकाणी खेळाडू आणि इतर कर्मचाºयांसाठी हॉटेलची सुविधा असल्यामुळे दौºयासाठी या दोन मैदानांची निवड करण्यात आल्याचं कळतंय.

आॅस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीने काही दिवसांपूर्वी २६ जणांचा प्राथमिक संघ निवडला असून येत्या काही दिवसांमध्ये अंतिम संघ निवडला जाईल. खेळाडूंच्या प्रवास आणि आरोग्यविषयक सर्व नियम स्पष्ट झाल्यानंतर याबद्दल अधिकृत माहिती देण्यात येईल असं क्रिकेट आॅस्ट्रेलियाने स्पष्ट केलंय.

Read More  अशोक गहलोत : सचिन पायलट बिनकामाचे, अकार्यक्षम आणि दगाबाज!

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या