21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeक्रीडाशेवटचे दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने अमेरिकेतच

शेवटचे दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने अमेरिकेतच

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील शेवटचे दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने अमेरिकेत होणार असल्याचे अखेर स्पष्ट झाले. खेळाडूंना अमेरिकेचा व्हिसा न मिळाल्याने आगामी दोन सामन्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते, परंतु आता भारत आणि वेस्ट इंडिज संघाच्या सर्व सदस्यांना अमेरिकेला जाण्यासाठी अधिकृतपणे मंजुरी देण्यात आल्याची बातमी आली आहे.

रोहित शर्मा आणि कंपनीला फ्लोरिडा सामन्यांसाठी व्हिसा मिळाला आहे. रविचंद्रन अश्विन फ्लोरिडाला पोहोचला आहे. रोहित शर्मा, राहुल द्रविड, संजू सॅमसन आणि इतर ११ जणांकडे अमेरिकेला जाण्यासाठी व्हिसा नव्हता, मात्र आता संपूर्ण टीमला व्हिसाची मंजुरी मिळाली आहे. म्हणजेच टी-२० मालिकेतील चौथा आणि पाचवा सामना फ्लोरिडामध्येच खेळवला जाईल. वेस्ट इंडिजचा संघ आधीच अमेरिकेत पोहोचला आहे.

‘क्रिकबझ’च्या अहवालानुसार ज्या खेळाडूंकडे व्हिसा नव्हता. त्याला गयाना येथील अमेरिकन मुलाखतीसाठी पाठवण्यात आले होते. तिस-या टी-२० सामन्यानंतर ही मुलाखत झाली.

यामध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा समावेश आहे. रवींद्र जडेजा, आर. अश्विन, दिनेश कार्तिक, रवी बिश्नोई, सूर्यकुमार यादव आणि कुलदीप यादव आधीच अमेरिकेला पोहोचले आहेत. भारतीय संघ या मालिकेत २-१ ने पुढे आहे. अशा परिस्थितीत चौथा टी-२० सामना जिंकून टीम इंडियाच्या नजरा सीरिज जिंकण्यावर असतील.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या