23 C
Latur
Friday, August 12, 2022
Homeआंतरराष्ट्रीयद. आफ्रिका क्रिकेटमध्ये मोठा फेरबदल ; केशव महाराज यांच्याकडे संघाचे नेतृत्व

द. आफ्रिका क्रिकेटमध्ये मोठा फेरबदल ; केशव महाराज यांच्याकडे संघाचे नेतृत्व

एकमत ऑनलाईन

मुंबई : दक्षिण आफ्रिकेच्या मर्यादित षटकांचा कर्णधार टेंबा बावुमा दुखापतीमुळे इंग्लंडच्या आगामी दौ-यातून बाहेर पडला आहे. बावुमा इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय आणि तितक्याच टी-२० सामन्यांच्या मालिकेशिवाय तीन कसोटी सामान्यांनाही मुकणार आहे. याशिवाय तो आयर्लंडविरुद्धचे दोन टी-२० सामने देखील खेळू शकणार नाही. बावुमाला जूनमध्ये भारत दौ-यावर झालेल्या टी-२० मालिकेत दुखापत झाली होती.

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या माहितीनुसार त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी आठ आठवड्यांचा कालावधी लागेल.
बावुमा दौ-यातून बाहेर पडल्यामुळे केशव महाराज वनडे आणि डेव्हिड मिलर टी-२० संघाचे नेतृत्व करतील. डीन एल्गर दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघाचा कर्णधार आहे, मात्र बावुमा कसोटी संघाच्या आघाडीच्या फळीचा महत्त्वपूर्ण फलंदाज आहे. त्यामुळे बावुमा संपूर्ण दौ-यातून बाहेर पडणे ही संघासाठी मोठी धक्कादायक बाब आहे.

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने इंग्लंड दौ-यासाठी ३२ वर्षीय फलंदाज रिले रोसोयुला टी-२० संघात परत आणले आहे. २०१६ मध्ये रोसोयु दक्षिण आफ्रिकेकडून अखेरीस खेळला होता आणि त्यानंतर तो इंग्लंडच्या काऊंटी संघ हॅम्पशायरमध्ये सामील झाला.

याशिवाय वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाला एकदिवसीय संघातून विश्रांती देण्यात आली असली तरी टी-२० आणि कसोटी संघात त्याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच युवा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झे हा टी-२० संघातील नवा चेहरा आहे. दक्षिण आफ्रिकेच्या इंग्लंड दौ-याची सुरुवात १९ जुलैपासून होणार असून पहिला एकदिवसीय सामना डरहम येथे खेळवला जाईल.

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कसोटी मालिका होणार आहे. लॉर्डस्, ओल्ड ट्रॅफर्ड आणि ओव्हल येथे कसोटी सामने खेळवले जातील. याशिवाय बावुमाला वगळता या वर्षी एप्रिलमध्ये बांगलादेशविरुद्ध झालेल्या डीन एल्गरच्या नेतृत्वाखालील संघात कोणतेही बदल झाले नाहीत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या