24.8 C
Latur
Monday, September 27, 2021
Homeक्रीडा१९ सप्टेंबरला रंगणार मुंबई-चेन्नईमध्ये लढत

१९ सप्टेंबरला रंगणार मुंबई-चेन्नईमध्ये लढत

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनामुळे आयपीएल १४ स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे उर्वरित स्पर्धा कधी आणि कशी असेल, याबाबत क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता होती. आता उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून खेळवले जाणार आहेत. तसेच अंतिम सामना १५ ऑक्टोबर रोजी होणार आहे, असे बीबीसीआयने जाहीर केलं आहे. ही स्पर्धा यूएईत पार पडणार आहे.

पहिलाच सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज या दोन संघात होणार आहे. अनेक संघांमध्ये कोरोनाची प्रकरणे समोर आल्यानंतर आयपीएलचे १४ वे सत्र ४ मे रोजी तहकूब करण्यात आले. २ मे पर्यंत एकूण २९ सामने खेळले गेले. आयपीएल स्थगित होईपर्यंत दिल्ली कॅपिटल्सने ८ सामन्यांमधून ६ विजयांसह आघाडी घेतली, तर चेन्नई सुपर किंग्ज पाच विजयांसह दुस-या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर विराट कोहलीचा आरसीबी पाच विजयांसह तिस-या स्थानावर आहे.

आयपीएल २०२१ स्पर्धेला ९ एप्रिलला सुरुवात झाली होती. मात्र कोरोनाचे संकट पाहता ही स्पर्धा स्थगित करण्यात आली. एक एक करत कोरोनाची लागण खेळाडूंना होत गेली आणि बीसीसीआयला स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागला. आयोजन करण्यापूर्वीच स्पर्धेवर कोरोनाची पडछाया होती. मात्र, बायो बबलचे कारण देत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. परदेशी खेळाडूंनी आयपीएल आयोजनावर प्रश्न उपस्थित करत मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडच्या खेळाडूंनी ही स्पर्धा अर्ध्यात सोडली होती. या स्पर्धेतील अजून ३१ सामने उरले आहेत.

सायबर फसवणुकीत बळी ठरले सर्वाधिक भारतीय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या