25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeक्रीडापावसामुळे सामना उशिरा सुरू होणार ; बीसीसीआयने ट्विट करून दिली माहिती

पावसामुळे सामना उशिरा सुरू होणार ; बीसीसीआयने ट्विट करून दिली माहिती

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे. सामन्यापूर्वी लखनौमध्ये खूप पाऊस झाला आहे. त्यामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला वनडे सामना उशिराने सुरू होणार आहे.

बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.
पहिल्या एकदिवसीय सामन्याचा पहिला चेंडू भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता खेळवला जाणार होता. मात्र आता बीसीसीआयने त्यात काही बदल केले आहेत. प्राथमिक तपासणीनंतर नाणेफेक आणि खेळ सुरू होण्याची वेळ अर्ध्या तासाने पुढे ढकलण्यात आल्याचे आढळून आले आहे.

आता नाणेफेक १:३० वाजता होणार आहे तर २ वाजता खेळ सुरू होणार आहे. लखनौमध्ये पाऊस थांबला असला तरी ढगाळ वातावरण आहे. जोरदार वारे वाहत असून सामना होण्याची शक्यता अजूनही कायम आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या